शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्यांच्या नाकदुऱ्या; सेना-भाजपात श्रेयवाद

By admin | Updated: March 25, 2017 01:25 IST

शिवसेना व भारतीय जनता पार्टीमधील श्रेयवादाचे नाट्य गुरुवारी नौपाडा, कोपरी परिसरांतील व्यापाऱ्यांच्या दुकानांसमोर पालिका प्रशासनाने केलेल्या ‘कचरा फेको’ आंदोलनानंतर

ठाणे : शिवसेना व भारतीय जनता पार्टीमधील श्रेयवादाचे नाट्य गुरुवारी नौपाडा, कोपरी परिसरांतील व्यापाऱ्यांच्या दुकानांसमोर पालिका प्रशासनाने केलेल्या ‘कचरा फेको’ आंदोलनानंतर हा तिढा संपुष्टात आणण्याकरिता रंगल्याची चर्चा आहे. महापालिका मुख्यालयात याच मुद्यावरून शिवसेना आणि भाजपामध्ये कलगीतुरा रंगल्याचे चित्र आहे.ठाणे महापालिकेने कचरा कराची वसुली करण्यासाठी गुरुवारी नौपाडा आणि कोपरीतील व्यापाऱ्यांच्या दुकानांसमोरच कचरा टाकला. त्यामुळे संतापलेल्या व्यापाऱ्यांनी त्याविरोधात आवाज उठवत आयुक्तांचा निषेध केला. जोपर्यंत आयुक्त येत नाहीत, तोपर्यंत दुकाने बंद ठेवण्याचा निर्णयही घेतला होता. पालिकेने आणून टाकलेला कचरा न उचलल्याने व्यापाऱ्यांनी हा कचरा उचलून नौपाडा प्रभाग समिती कार्यालयासमोर आणून टाकला. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले होते. परंतु, या वेळी भाजपाचे स्थानिक नगरसेवक संजय वाघुले आणि त्यांच्या पॅनलमधील इतर नगरसेवक, महापौर मीनाक्षी शिंदे, सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी घटनास्थळी धाव घेऊन व्यापाऱ्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. कचरा टाकणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यासाठी या व्यापाऱ्यांनी थेट महापालिका मुख्यालयात ठिय्या आंदोलन केले. महापालिका आयुक्तांनी या विषयावर आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली. परंतु, आयुक्त मुख्यालयात न आल्याने यावर मार्ग निघत नव्हता. अखेर, सायंकाळी भाजपा आ. संजय केळकर यांनी मुख्यालयातील अधिकाऱ्यांबरोबर संवादाची तयारी दर्शवली. (प्रतिनिधी)