शहरं
Join us  
Trending Stories
1
"वायफळ बडबड करू नका..."; राऊतांचा दावा काँग्रेसनेच खोडला, ठाकरे गटालाही फटकारलं
2
संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न
3
“जीवापेक्षा मोठे काही नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारने...”: मनोज जरांगे पाटील
4
शरद पवारांना दुहेरी धक्का; २ अत्यंत विश्वासू शिलेदार पक्षाची साथ सोडणार?
5
“सहाव्या टप्प्यात इंडिया आघाडीने २७२ जागांचा आकडा गाठला, भाजपाचा पराभव निश्चित”: काँग्रेस
6
१ जूनपासून गॅस सिलेंडर ते बँकिंगचे नियम बदलणार; थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार
7
Cyclone Remal: 'रेमल' चक्रीवादळ आज बंगालमध्ये धडकणार, एनडीआरएफचे पथक सतर्क; महाराष्ट्रावर परिणाम होणार?
8
“पंतप्रधान मोदींची भाषा अन् भाजपाच्या जागा दोन्ही सातत्याने घसरत चालल्या आहेत”: राहुल गांधी
9
“PM मोदींची १०० वेळा जगभ्रमंती, उद्धव ठाकरे परदेशात गेले तर पोटात का दुखते”; राऊतांची टीका
10
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
11
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
12
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!
13
"नशिबाने माझ्या नावाचा कोणी सुलतान नव्हता, नाहीतर...", नावावरून ट्रोल करणाऱ्यांना आस्ताद काळेने सुनावलं
14
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी
15
Hardik-Natasa Divorce : हार्दिक पांड्याबरोबरच्या घटस्फोटाच्या चर्चांवर नताशाने दोन शब्दात दिलं उत्तर, म्हणाली...
16
अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला
17
लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!
18
वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण
19
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
20
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल

दी बर्निंग व्हॅन ; प्रदूषण विभागाच्या वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2021 2:23 PM

The Burning Van : सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वाहन आणि त्यामधील मशीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

ठाणे - भारत सरकारच्या प्रदूषण विभागाच्या वाहनाला ठाण्यातील घोडबंदर रोडवरील नागला बंदर सिग्नल येथे अचानक आग लागल्याची घटना शुक्रवारी दुपारी पावणे एक ते एक वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वाहन आणि त्यामधील मशीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनेमुळे दहा ते पंधरा मिनिटांसाठी वाहतुक थांबविण्यात आली होती.       

ही व्हॅन मीरारोडवरून बाळकुमकडे जात होती. यावेळी गाडीत चालकासह अन्य दोन जण होते. गाडीत नागला बंदर रोड येथील सिग्नलला येताच गाडीतून मोठ्या प्रमाणात धूर येण्यास सुरू झाले आणि अचानक गाडीला आग लागली. या गाडीत ध्वनी व हवेतील धुलीकणाचे प्रदुषन मोजण्याच्या मशिन्स होत्या. आगीची माहिती मिळताच ठाणे महापालिका प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभाग,अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तातडीने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. मुख्य रस्त्यावर वाहनाला आग लागल्याने त्या रस्त्यावरील वाहने दहा ते पंधरा मिनिटे थांबविण्यात आले होते. यावेळी एक फायर इंजिन, एक रेस्क्यू वाहन आणि एक हायड्रा पाचारण केले होते.अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संतोष कदम यांनी दिली.

टॅग्स :fireआगFire Brigadeअग्निशमन दलthaneठाणे