शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

कामचुकारांना दणका

By admin | Updated: January 22, 2016 02:10 IST

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या १७ कर्मचाऱ्यांना कामचुकारपणा केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. आयुक्त ई.

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या १७ कर्मचाऱ्यांना कामचुकारपणा केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. आयुक्त ई. रवींद्रन यांनी दुसऱ्यांदा अशी धडक कारवाई केली आहे. याआधी दांडीबहाद्दर आरोग्य निरीक्षकासह २४ कर्मचाऱ्यांना निलंबित केले होते. गुरूवारी केलेल्या कारवाईत कल्याणमधील अ आणि क तर डोंबिवलीतील ह प्रभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.सद्यस्थितीला कल्याण डोंबिवली शहरात फेरीवाला विरोधी आणि अनधिकृत बांधकामावरील कारवाईची विशेष मोहीम आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. त्यानुसार प्रत्येक प्रभाग क्षेत्र अंतर्गत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पथके गठीत करून त्यांना विशिष्ट जबाबदारी दिली आहे. परंतु, काही कर्मचारी कामात हयगय व निष्काळजीपणा करीत असल्याचे निदर्शनास आल्याने संबंधितांवर आयुक्तांच्या आदेशाने निलंबनाची कारवाई केल्याचे सामान्य प्रशान विभागाचे उपायुक्त दीपक पाटील यांनी सांगितले. यात क प्रभागातील प्रभाकर घेंगट, वसंत सोळंकी, दीपक जाधव, राहुल भालेराव, मंगल भालके, शाम कारभारी, राजू शिलवंत, सदाशिव मढवी, जनन लोखंडे, गोवर गोस्वामी यांच्यासह अ प्रभागातील अनंता गंगावणे, कृ ष्णा घनघाव, दादासाहेब निकाळजे, अनिलकुमार वाल्मिकी तर ह प्रभागातील महेश सोळंकी, जयहिंद पालकरी, संतोष धनगर या कर्मचारी आणि सफाई कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. फेरीवाले हटविणे,अनधिकृत बांधकामे निष्कासित करणे याचबरोबर अनधिकृत होर्डिंग, बॅनर काढणे आदी कामांमध्ये हयगय केल्याचा ठपका संबंधितांवर ठेवला आहे.काही काळापूर्वी आयुक्तांनी ब प्रभागातील हजेरी शेडला भेट दिली होती. तेथे सफाई कामगार कामावर हजर नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते. त्यावेळी २४ जणांवर निलंबन कारवाईचा बडगा उगारला होता. आता पुन्हा एकदा त्यांनी १७ जणांवर कारवाई केल्याने कामचुकारपणा कराल, तर कारवाई अटळ असल्याचा संदेशच त्यांनी कृतीतून दिला आहे. (प्रतिनिधी)