लाचलुचपतच्या तोतया अधिकाऱ्यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 06:19 AM2021-01-04T06:19:07+5:302021-01-04T06:19:14+5:30

व्यापाऱ्याकडे मागितली एक लाखांची खंडणी

Bribery officials arrested | लाचलुचपतच्या तोतया अधिकाऱ्यांना अटक

लाचलुचपतच्या तोतया अधिकाऱ्यांना अटक

Next


कुमार बडदे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंब्रा : गुन्हा दाखल न करण्यासाठी व्यापाऱ्याकडे एक लाखांची खंडणी मागितलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या दोन तोतया अधिकाऱ्यांना मुंब्रा पोलिसांनी अटक केली. अलमदर पुन्जा (३०, रा. जैनबिय काॅम्प्लेक्स, राॅयल गार्डन, कौसा, मुंब्रा) आणि जयेश सोनावणे (३१, रा. भोईर चाळ, दत्तवाडी, मुंब्रा) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
आरोपींनी कौसा भागातील सिमला पार्क परिसरातील मिनार रेसिडेन्सीमध्ये राहत असलेल्या मुबशीर शेख यांच्या रशीद कम्पाउंड येथील हशमत चौकात असलेल्या सुपारी विक्रीच्या दुकानात शनिवारी रात्री जाऊन आपण नवी मुंबईतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील अधिकारी असल्याचे शेख यांना सांगितले. तुमच्या दुकानामध्ये गुटख्याची विक्री होत असल्यामुळे तुमच्यावर गुन्हा दाखल करण्यात येत असून, तो करण्यात येऊ नये, असे वाटत असेल तर एक लाख रुपये द्या, अशी मागणी त्यांनी केली. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी त्वरित दुकानात जाऊन दोघांना अटक केली. अंगझडतीमध्ये त्यांच्याकडे बृहन्मुंबई महापालिकेच्या स्वच्छता आणि आरोग्य विभागाचे तसेच नॅशनल सिक्युरिटी आणि करप्शन क्राइम प्रिव्हेंटिव्ह ब्रिगेडची बोगस ओळखपत्रे आढळून आली. पोलिसांनी ती ताब्यात घेतली आहेत. 

Web Title: Bribery officials arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.