शहरं
Join us  
Trending Stories
1
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
2
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
3
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
4
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
5
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
6
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले...
7
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
8
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
9
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
10
'भुजिया किंग' शिवरतन अग्रवाल यांचे निधन; शुन्यातून उभारले हजारो कोटींचे साम्राज्य...
11
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
12
Gondia Crime: 'तुला जिवे मारीन' म्हणत हात-पाय बांधून शाळेत डांबले; लग्नासाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण
13
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
14
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
15
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
16
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
17
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
18
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
19
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
20
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
Daily Top 2Weekly Top 5

चाळी तोडा अन्यथा पाडू - रेल्वे

By admin | Updated: November 15, 2016 04:16 IST

रेल्वेच्या जागेवर अतिक्रमण करून त्याठिकाणी बेकायदा चाळी बांधून अडीचशेहून अधिक गरीब कुुटुंबयांची फसवणूक झाली आहे. या चाळी पाडा अन्यथा

शशी करपे / वसईरेल्वेच्या जागेवर अतिक्रमण करून त्याठिकाणी बेकायदा चाळी बांधून अडीचशेहून अधिक गरीब कुुटुंबयांची फसवणूक झाली आहे. या चाळी पाडा अन्यथा त्यापाडण्यात येतील अशा नोटिसा रेल्वेने संबंधितांना दिल्याने चाळमाफियांचा मोठा घोटाळा चव्हाट्यावर आला आहे. यामुळे अडीचशेहून अधिक कुुटुंबे बेघर होणार आहेत.नालासोपारा पूर्वेकडील मोरेगावात सुमारे १२ चाळमाफियांनी १५ वर्षांपूर्वी रेल्वेच्या जागेवर अतिक्र मण करून बेकायदा चाळी बांधून विकल्या. हा परिसर जिजाईनगर नावाने ओळखले जाते. रुम विकतांना करारनाम्यात रेल्वेऐवजी दुसऱ्याचा सातबारा जोडून फसवणूक केल्याचे आता उजेडात आले आहे. या करारनाम्यानुसार लोकांना तत्कालीन नालासोपारा नगरपालिकेने घरपट्टी आणि पाणी पट्टी आकारणी केली आहे. येथील लोकांकडे १५ वर्षांपासून रेशन कार्ड आहेत. त्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट आहेत. वीज दिलेली आहे. आधारकार्ड, पॅनकार्डेही आहेत. पण, जागेवर अतिक्रमण करून बेकायदा बांधकाम केले असल्याने आपण बांधकाम स्वत:हून पाडावे अन्यथा रेल्वे ते पाडून त्यासाठी झालेला खर्च आपणाकडून वसूल करेल अशी नोटीस रेल्वेने प्रत्येक घरमालकाच्या नावानिशी बजावली आहे. रेल्वेने रेल्वे कोर्टात याप्रकरणी खटलाही दाखल केला आहे. तसेच अतिक्रमण तोडतांना रेल्वे त्यांना पर्यायी जागा देणार नसल्याने ही कुटुंबे बेघर होणार आहेत. शिवसेनेने गटनेते नगरसेवक धनंज गावडे यांनी सर्व एकत्रित करून जिजाई नगर रहिवासी संघाची स्थापना केली आहे. त्याची पहिली सभा सोमवारी पार पडली. यावेळी शिवसेना शहर कार्यालयप्रमुख रमेश मोरे, शाखाप्रमुख रविकांत नागरे, सुनयना विलास साळुंखे, संघातर्फे विनोद सहानी यांनी लोकांना मार्गदर्शन केले.