शहरं
Join us  
Trending Stories
1
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
2
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
3
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
4
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
5
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
6
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
7
Khaleel Ahmed: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
8
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
9
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
10
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
11
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
12
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
13
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
14
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
15
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
16
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
17
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
18
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
19
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
20
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

‘ते’ दोघे पुन्हा महापालिकेच्या सेवेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2019 00:54 IST

एकीकडे केडीएमसीत लाचखोरीचा सिलसिला सुरू असताना दुसरीकडे लाचखोरीच्या तसेच अन्य प्रकरणांत निलंबित होऊन एक वर्षाहून अधिक काळ लोटला आहे,

कल्याण : एकीकडे केडीएमसीत लाचखोरीचा सिलसिला सुरू असताना दुसरीकडे लाचखोरीच्या तसेच अन्य प्रकरणांत निलंबित होऊन एक वर्षाहून अधिक काळ लोटला आहे, अशा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सेवेत घेण्याबाबत फेरविचार करणारी निलंबन आढावा समितीची बैठक मंगळवारी मुख्यालयात पार पडली. यामध्ये राजन ननावरे आणि श्रीपत मढवी यांचे निलंबन रद्द करून त्यांना महापालिकेच्या सेवेत रुजू करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला.लाचखोरीप्रकरणी निलंबित झाल्यानंतर पहिले तीन महिने ५० टक्के, त्यानंतर ७५ टक्के वेतन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सुरू असते. त्यात नियमाप्रमाणे लाचखोरीमध्ये निलंबित झालेल्यास न्यायालयात अभियोग दाखल झाल्यानंतर एक वर्षाने पुन्हा सेवेत घेण्याबाबत विचार केला जातो. त्यासाठी निलंबन आढावा समिती स्थापन केली आहे. अन्य प्रकरणांमध्ये निलंबित असलेल्यांचाही निर्णय ही समिती घेते. या निलंबन आढावा समितीत आयुक्त, सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त, सहायक आयुक्त, लाचलुचपतच्या अधिकाºयांसह अन्य अधिकाºयांचा समावेश आहे. दर सहा महिन्यांनी निलंबन आढावा समितीची बैठक घेणे क्रमप्राप्त असते. केडीएमसीत मात्र सहा महिन्यांहून अधिक काळ झाला तरी समितीची बैठक झालेली नव्हती. आचारसंहिता संपल्यानंतर २८ मे चा मुहूर्त बैठकीसाठी काढला होता. त्याप्रमाणे मंगळवारी बैठक पार पडली. सध्या महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत, प्रभागक्षेत्र अधिकारी गणेश बोराडे, स्वाती गरूड, शरद पाटील, परिवहन उपक्र मातील अधीक्षक राजन ननावरे या अधिकाºयांसह काही कर्मचारी लाचखोरीत निलंबित आहेत. यातील काहींना निलंबित होऊन दीड वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. त्यामुळे समितीची बैठक कधी लागते, याकडे निलंबित अधिकारी व कर्मचाºयांचे लक्ष लागले होते.मंगळवारी लाचखोरीसह अन्य प्रकरणांत निलंबित १४ जणांचे प्रस्ताव बैठकीत मांडले होते. ज्यांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आलेली नाही, अशांची चौकशी सुरू करावी आणि त्यांचे प्रस्ताव पुढील बैठकीत ठेवावेत, अशा सूचना आयुक्त गोविंद बोडके यांनी दिल्या. तर विभागीय चौकशी झालेले केडीएमटीतील वरिष्ठ लिपिक राजन ननावरे यांच्यासह कामगार श्रीपत मढवी यांचे निलंबन संपुष्टात आणून त्यांना महापालिका सेवेत रुजू करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला.>यासाठी झाले होते निलंबनकेडीएमटी उपक्रमातील ननावरे यांनी २७ डिसेंबर २०१६ रोजी तिकीट घोटाळ्याचा ठपका ठेवलेल्या वाहकास कामावर परत घेण्याची काढलेली आॅर्डर देण्यासाठी सात हजारांची लाच मागितली होती. ती घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सापळा लावून ननावरे यांना अटक केली होती. तर, कामगार श्रीपत मढवी हा एका मारामारी प्रकरणात फौजदारी कारवाई झाल्याप्रकरणी निलंबित होता. त्यालाही सेवेत घेण्याचा निर्णय निलंबन आढावा समितीने घेतला आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका