शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचा शिवसेनेला जायंट ‘दे धक्का ’

By admin | Updated: September 2, 2016 03:43 IST

काही दिवसांपूर्वीच झालेल्या प्रभाग क्र. ३२ अ च्या पोटनिवडणुकीत शिवसेना, भाजपा आणि काँग्रेसला पराभवाची धूळ चारण्याचे काम करणारे आणि जायंट किलर ठरलेले

ठाणे : काही दिवसांपूर्वीच झालेल्या प्रभाग क्र. ३२ अ च्या पोटनिवडणुकीत शिवसेना, भाजपा आणि काँग्रेसला पराभवाची धूळ चारण्याचे काम करणारे आणि जायंट किलर ठरलेले, काँग्रेसचे माजी नगरसेवक संजय घाडीगावकर यांच्यासह अपक्ष नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या स्वाती देशमुख यांनी बुधवारी रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. घाडीगावकर यांचा भाजपा प्रवेश हा शिवसेनेला मोठा धक्का मानला जात असून यामुळे शिवसेना नेते तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.प्रभाग क्र. ३२ अ च्या झालेल्या पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार स्वाती देशमुख या निवडून आल्या आहेत. परंतु, अवघ्या तीनच दिवसांत त्यांनी भाजपात प्रवेश केला. या निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस आणि भाजपाला धूळ चारून जायंट किलर ठरलेले काँग्रेसचे माजी नगरसेवक संजय घाडीगावकर यांनीदेखील अचानक भाजपामध्ये प्रवेश केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे त्यांना शिवसेनेत खेचण्यासाठी एका आमदाराने आपली ताकद पणाला लावली होती. परंतु, त्यांची ही खेळी अपुरी ठरल्याचे आता म्हणावे लागणार आहे. घाडीगावकर यांनी स्वबळावर स्वाती देशमुख यांचा विजय खेचून आणला होता. त्यामुळे भविष्यात किसननगर, भटवाडी भागांत याचे पडसाद उमटणार असल्याची चर्चा सुरू असतानाच त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याने शिवसेनेला हा मोठा धक्का बसला आहे. तर, काँग्रेसलादेखील हा धक्का पचवणे कठीण जाणार आहे.काँग्रेसमध्ये का थांबायचे, ज्या वेळेस माझ्यावर हल्ला झाला, त्या वेळेस काँग्रेसने कोणते सहकार्य केले. त्यामुळे त्यांना माझी गरज नाही, तर मग का पक्षात राहायचे. भाजपाने माझ्या अटी, शर्ती मान्य केल्याने मी हा निर्णय घेतला.- संजय घाडीगावकर, माजी नगरसेवक