भ्रष्टाचार दडपण्यासाठी भाजपाने विरोधकांचा आवाज दाबला, शिवसेना आणि काँग्रेसचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2021 08:59 PM2021-01-15T20:59:44+5:302021-01-15T21:01:05+5:30

Mira Bhayander Municipal Corporation News : भाजपाने महापालिकेतील कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे दडपण्यासाठी विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी दिलेले नियम ज चे प्रस्ताव चर्चेला घेतले नाहीत असा आरोप महासभे नंतर शिवसेना व काँग्रेसच्या नगरसेवकांनी केला आहे .

BJP suppressed the voice of opposition to suppress corruption, Shiv Sena and Congress accused |  भ्रष्टाचार दडपण्यासाठी भाजपाने विरोधकांचा आवाज दाबला, शिवसेना आणि काँग्रेसचा आरोप

 भ्रष्टाचार दडपण्यासाठी भाजपाने विरोधकांचा आवाज दाबला, शिवसेना आणि काँग्रेसचा आरोप

Next

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या ऑनलाईन महासभेत सत्ताधारी भाजपाने महापालिकेतील कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे दडपण्यासाठी विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी दिलेले नियम ज चे प्रस्ताव चर्चेला घेतले नाहीत असा आरोप महासभे नंतर शिवसेनाकाँग्रेसच्या नगरसेवकांनी केला आहे .

महासभेसाठी नियम ज अन्व्ये आमदार गीता जैन यांनी १०० कोटी रुपयांच्या मोकळ्या जागांवरील कर वसुली थकबाकीचा मुद्दा घेतला होता . काँग्रेसचे नगरसेवक अनिल सावंत यांनी महापालिकेच्या बांधकाम विभागाने सार्वजनिक उत्सव, कार्यक्रम व थेट २०२२ सालच्या महापालिका निवडणुकीसाठी मंडप , खुर्च्या आदी चे १२ कोटी ७१ लाखांचे कंत्राट देण्यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा प्रस्ताव दिला होता .

काँग्रेस आघाडीचे नगरसेवक राजीव मेहरा यांनी मीरारोडच्या भारतरत्न इंदिरा गांधी पालिका रुग्णालयात वरच्या दोन मजल्यांच्या कामासाठी सुमारे साडे पाच कोटी रुपयांचे कंत्राट दंडिलें असून त्यात मोठा भ्रष्टाचार झाल्या मुद्दा ज च्या प्रस्तावा खाली दिला होता .

परंतु सत्ताधारी भाजपाने विरोधी पक्षांचे हे प्रस्ताव चर्चेला न घेताच ते फेटाळून लावले . त्यामुळे विरोधी पक्ष नेते प्रवीण पाटील , शिवसेना गटनेत्या नीलम ढवण , काँग्रेसचे गटनेते जुबेर इनामदार , नगरसेवक अनिल सावंत , राजीव मेहरा , मर्लिन डिसा , काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत आदींनी सत्ताधारी भाजपा वर आरोप केले आहेत .

महापालिकेत भाजपाची एकहाती सत्ता आल्या पासून भ्रष्टाचाराने कळस गाठला असून शहराची अवस्था बिकट करून टाकली आहे . नागरिक समस्या व भ्रष्टाचाराने त्रासले असून बांधकाम विभाग , नगररचना विभाग आदी भ्रष्टाचाराचे मोठे अड्डे बनल्याचा आरोप इनामदार व सावंत यांनी केला आहे . भाजपाचे ह्या भ्रष्टाचारात संगनमत असल्याने विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा प्रकार केला जात आहे . पण ह्या विरोधात शासना कडे दाद मागणार असा इशारा सामंत यांनी दिला आहे .

Web Title: BJP suppressed the voice of opposition to suppress corruption, Shiv Sena and Congress accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.