शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत भाजपा ६५ जागा लढण्यावर ठाम; शिंदेसेनेला १७ जागा देण्याची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 08:05 IST

भाजपा ६५, शिंदेसेना १७ व उरलेल्या १३ जागा वाटून घ्यायच्या असा मेहतांचा जागावाटप फॉर्म्युला  

धीरज परब

मीरारोड - आगामी मीरा भाईंदर महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीने लढू अशी विधाने परिवहन मंत्री प्रताप सरनाईकभाजपा आमदार नरेंद्र मेहता करत आहेत. प्रत्यक्षात मात्र हे दोन्ही नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत.  माझी एका पायावर युती करायची तयारी असून आमच्या ६५, शिवसेनेच्या १७ व उरलेल्या १३ जागा वाटून घ्यायच्या असं जागावाटपचे सूत्रच आमदार मेहता यांनी सांगितले परंतु मंत्री सरनाईक यांनाच युती करायची नाही असा टोलाही लगावला.   

मीरा भाईंदर हा एकेकाळी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला. त्यातही प्रामुख्याने राजस्थान, गुजरात, उत्तरप्रदेश, बिहार राज्यातील नागरिकांची शहरातील संख्या लक्षणीय असून २०१४ साली मोदी पर्वाने येथील मतदारांचा कल भाजपाकडे वाढला. त्यातूनच महापालिकेत २०१७ साली चार सदस्य पॅनल पद्धतीच्या निवडणुकीचा फायदा भाजपाला झाला आणि भाजपाचे तब्बल ६१ नगरसेवक निवडून आले. भाजपाने एकहाती सत्ता मिळवली. शिवसेनेचे २२ व काँग्रेस १२ नगरसेवक निवडून आले होते.  शिवसेनेतून ४ तर काँग्रेस मधून ३ असे ७ नगरसेवक भाजपात गेले आहेत.  भाजपातील दोन नगरसेवक शिंदेसेनेत गेले असून गीता जैन ह्यांनी अजून तरी अन्यत्र प्रवेश केलेला नाही. शिवसेनेच्या फुटीनंतर शिंदेसेनेत १५ नगरसेवक आहेत. भाजपातून आलेल्या दोघांना मोजले तर १७ नगरसेवक शिंदेसेनेकडे आहेत. भाजपाकडे गीता जैन यांना वगळले तर ५८ आणि सेना - कॉग्रेस मधून आलेले ७ असे ६५ नगरसेवक आहेत.  

एकहाती सत्ता असताना भाजपाकडून सरनाईक व सेनेची बरीच अडवणूक झाल्याचे आरोप नवीन नाहीत. त्यातूनच मंत्री सरनाईक व आ. मेहता यांच्यात एकमेकांवर आरोप व टीका सुरु असतात. महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आता मंत्री सरनाईक व आ. मेहता हे महायुतीने लढायची तयारी असल्याचे जाहीरपणे सांगत आहेत. परंतु युतीच्या अनुषंगाने दोघांमध्ये चर्चा मात्र झालेली नाही.  आ. मेहता यांनी सांगितले की, पक्षाने युती करायची की नाही हे स्थानिक नेत्याने ठरवावे असे सांगितलेले आहे. मी एका पायावर युती करायला तयार आहे. ते वरती युती बाबत बोलायला गेले तरी तिकडून माझ्याशी बोला असेच उत्तर त्यांना मिळेल. त्यांना युतीची बोलणी करायला माझ्याकडेच यावे लागणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी पण मला कॉल करून युती बाबत मत विचारले. त्यांना सुद्धा तुमच्याकडे असलेले नगरसेवक तेवढ्या जागा तुम्ही लढवा, आमच्याकडे जेवढे नगरसेवक आहेत तेवढ्या जागा आम्हाला द्या असे व्यावहारिक सांगितले. शिंदे यांनी देखील तुमचे बरोबर आहे सांगितल्याचे आ. मेहता म्हणाले.  

आमचे ६५ नगरसेवक असल्याने त्याजागा आम्ही घेतो आणि तुमचे १७ नगरसेवक असल्याने त्या जागा  तुम्ही घ्या. उरलेल्या १३ जागा दोघे वाटून घेऊ. एका सेकंदात युतीचा निर्णय होऊन पत्रकार परिषद घेऊन जाहीर करून टाकू. परंतु मंत्री सरनाईक हे केवळ लोकांना दाखवायला महायुतीची भाषा करत आहेत. ते युती करणार नाहीत कारण त्यांना माहिती आहे. १७ जागा घेऊन ते काय लढणार. माजी आमदार गीता जैन आमच्याच आहेत कारण अजून त्या दुसऱ्या पक्षात गेलेल्या नाहीत अशी गुगली देखील आ. मेहतांनी सोडली.  तर दुसरीकडे  मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत युतीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष यांच्याशी चर्चा करू असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : BJP Firm on 65 Seats in Mira Bhayandar Election.

Web Summary : BJP insists on contesting 65 seats in Mira Bhayandar municipal election, offering 17 to Shinde's Sena. Mehta criticizes Sarnaik's reluctance for alliance despite public statements. Discussions ongoing with central leadership.
टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेpratap sarnaikप्रताप सरनाईकBJPभाजपाMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकElectionनिवडणूक 2024