दुचाकीवरुन पडल्यामुळे ट्रेलरखाली सापडून दुचाकीस्वाराचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2022 21:50 IST2022-07-31T21:50:14+5:302022-07-31T21:50:44+5:30
Accident Case : ठाण्याच्या खारेगाव येथील घटना

दुचाकीवरुन पडल्यामुळे ट्रेलरखाली सापडून दुचाकीस्वाराचा मृत्यू
ठाणे: दुचाकीवरुन पडल्यानंतर एका अज्ञात ट्रेलरखाली सापडून संतोष मेस्त्री (४०, रा. साठेवाडी, वागळे इस्टेट, ठाणे ) या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाण्याकडून कल्याणकडे जाणाऱ्या मार्गावर खारेगाव टोल नाक्याजवळ मुंबई - नाशिक रोडवर एका दुचाकीवरुन संतोष मिस्त्री (४०, रा. साठेवाडी, वागळे इस्टेट, ठाणे ) आणि योगेंद्रप्रसाद नायक (३२, रा. साठेवाडी, ठाणे) हे दोघेही एका मोटारसायकलीवरुन जात होते. त्याचवेळी रस्त्यावरील बारीक रेतीवरून त्यांची दुचाकी घसरल्याने संतोष खाली कोसळला. याच दरम्यान त्यांच्या पाठीमागून आलेला एक अज्ञात ट्रेलर संतोषच्या अंगावरुन गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन विभागाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र संतोषचा तोपर्यंत मृत्यू झाला होता. त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठविण्यात आल्याची मािहती वाहतूक शाखेचे पाेलीस हवालदार गुरुषांत कुंभार यांनी िदली.