पालिका अधिकाऱ्यास मारहाण; दोघा फेरीवाल्यांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:43 IST2021-09-26T04:43:13+5:302021-09-26T04:43:13+5:30

मीरा रोड : भाईंदर पश्चिमेस डॉ. बाबासाहेब आंबेडकर ६० फुटी मार्गावर अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांनी पालिकेच्या सेवेतील कनिष्ठ अभियंता वैभव ...

Beating of a municipal officer; Crime on two peddlers | पालिका अधिकाऱ्यास मारहाण; दोघा फेरीवाल्यांवर गुन्हा

पालिका अधिकाऱ्यास मारहाण; दोघा फेरीवाल्यांवर गुन्हा

मीरा रोड : भाईंदर पश्चिमेस डॉ. बाबासाहेब आंबेडकर ६० फुटी मार्गावर अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांनी पालिकेच्या सेवेतील कनिष्ठ अभियंता वैभव कुलथे यांना मारहाण व धक्काबुक्की केल्याची घटना शुक्रवारी घडली. याप्रकरणी दोघा फेरीवाल्यांवर भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुक्रवारी महानगरपालिका फेरीवाला पथक प्रमुख राकेश त्रिभुवन यांच्या निरीक्षणाखाली भाईंदर पश्चिमेस प्रभाग समिती क्रमांक २ अंतर्गत ६० फूट मार्गावरील बेकायदा फेरीवाल्यांवर कारवाई सुरू होती. यावेळी कनिष्ठ अभियंता वैभव कुलथे, सेलवाकुमार आरमुगम, महाराष्ट्र सुरक्षा बलचे जवान शुभम पाटील हे भाजीवाल्यांवर कारवाई करीत होते. त्यावेळी काही भाजी विक्रेता गोळा झाले. त्यातील राजेश गुप्ता या विक्रेत्याने त्रिभुवन व कुलथे यांच्याशी वाद घालून त्यांना धक्काबुक्की केली. गुप्तासोबत असलेल्या अनोळखी फेरीवाल्याने कुलथे यांच्या पाठीवर मारून पळ काढल्याची माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली. याप्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्यात राजेश गुप्ता व एका अनोळखी फेरीवाल्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Beating of a municipal officer; Crime on two peddlers