शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ सूत्रधारास अटक

By admin | Updated: May 21, 2017 02:06 IST

येथील महाराष्ट्र बँकेत ५५ लाखाचा व भार्इंदर, ठाणे, घाटकोपर, विरार येथील विविध बँकातून सुमारे ३ कोटी यू पी आय (युनिफाईड पेमेंट इंटरफेस) प्रणालीद्वारे हडपणाऱ्या मुंबईचा

- लोकमत न्यूज नेटवर्क

पालघर : येथील महाराष्ट्र बँकेत ५५ लाखाचा व भार्इंदर, ठाणे, घाटकोपर, विरार येथील विविध बँकातून सुमारे ३ कोटी यू पी आय (युनिफाईड पेमेंट इंटरफेस) प्रणालीद्वारे हडपणाऱ्या मुंबईचा मास्टरमार्इंड जतिन संखे याला त्याच्या ३ साथीदारांसह पालघर पोलिसांनी भार्इंदर येथून अटक केली. प्रतिक पद्मनाभ पुजारी, जुगल शहा व राजू दासानिया अशी त्यांची नावे असून ते सर्व भार्इंदरचे आहेत. त्यांना न्यायालयाने आज सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.या आरोपींनी पालघरमधील बँक आॅफ महाराष्ट्राच्या शाखेत इतरांच्या नावे त्यांच्या नकळत खाती उघडून व त्यांना स्वत:च्या मोबाइलचे क्र मांक देऊन ते अ‍ॅक्टिव्हेट करून घेतले. त्याद्वारे बँकेच्या यूपीआय प्रणालीतून डिसेंबरमध्ये सुमारे ५५ लाख हडप केले. हे जानेवारीत निदर्शनास येताच बँकेने ही प्रणाली तात्काळ बंद केली व संबंधित खातेदारांविरूध्द पोलिसात तक्र ार दाखल केली.मात्र खरे आरोपी दुसरेच आहेत हे पोलीसांच्या लक्षात आले. तपासात याचा मास्टरमार्इंड जतीन संखे याच्यासह प्रतिक पुजारी, जुगल शहा व राज दासानिया हे ही सामील असून मुंबई-ठाणे परिसरातील अन्य बँकातून याच रितीने ३ कोटी हडप केल्याचे पोलिसांना कळले. बँकेने ज्या खातेदारांना आरोपी ठरवून पोलिसांत तक्रार दाखल केली त्यांना या प्रकाराची कल्पनाही नव्हती कारण त्यांना अंधारात ठेवूनच ही चौकडी हा गुन्हा करीत होती त्यामुळे आता त्यांच्याविरूध्दच्या तक्रारी मागे घेण्याचे कामही बँकेला करावे लागणार आहे. या प्रकरणाचा मास्टरमार्इंड आता ताब्यात आल्याने तपास अधिक गतीने होईल. - संजय हजारे, पो.निरीक्षक