शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

पावणेचौदा लाखांचे दागिने घेऊन पळालेल्या कारागिरास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:46 IST

मीरा रोड : पावणेचौदा लाखांचे दागिने चोरून पोबारा केलेल्या दागिन्यांचे डिझाईन करून देणाऱ्या कारखान्यातील कारागिरास भाईंदरच्या नवघर पोलिसांनी २४ ...

मीरा रोड : पावणेचौदा लाखांचे दागिने चोरून पोबारा केलेल्या दागिन्यांचे डिझाईन करून देणाऱ्या कारखान्यातील कारागिरास भाईंदरच्या नवघर पोलिसांनी २४ तासांत मालाड येथून मुद्देमालासह रविवारी अटक केली. जोखमीचे काम असूनदेखील कारखाना मालकाकडे आरोपी कारागिराचा पत्ता तर सोडाच पूर्ण नावदेखील नव्हते.

मधुसूदन घोष यांचा भाईंदर पूर्वेला सोने व हिऱ्याच्या दागिन्यांना डिझाईन करण्याचा व्यवसाय आहे. दागिन्यांना डिझाईन करण्यासाठी त्यांनी बिश्वनाथ नावाच्या कारागिरास कामावर ठेवले होते. घोष यांनी १० सप्टेंबर रोजी बिश्वनाथकडे १३ लाख ७६ हजार रुपयांचे सोने व हिऱ्याचे दागिने डिझाईन करण्यासाठी दिले होते. परंतु बिश्वनाथ हे दागिने घेऊन ११ सप्टेंबर रोजी पळून गेला. घोष यांनी दिलेल्या तक्रारीवरून भाईंदर पूर्वेच्या नवघर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला.

नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रकाश मासाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश काळे, उपनिरीक्षक संदीप मोहोळसह रवींद्र भालेराव, ऐनुद्दीन शेख, संदीप जाधव, युनुस गिरगावकर व अमित कुमार पाटील यांच्या पथकाने तपास सुरू केला. गंभीर बाब म्हणजे मौल्यवान दागिन्यांचे काम असताना घोष यांनी बिश्वनाथ याला कामावर ठेवताना त्याची पोलिसांकडून चारित्र्य पडताळणी तर सोडाच, त्याचे पूर्ण नाव, पत्ता व कोणतेही ओळखपत्र घेतले नव्हते. पोलिसांनी गुन्ह्याचा तांत्रिक दृष्टीने तपास करून बातमीदारांच्या मदतीने अवघ्या एका दिवसात आरोपीची माहिती मिळवली व त्याला मालाडच्या मालवणी येथील आंबोजवाडी झोपडपट्टीतून अटक केली. आरोपीकडून चोरीचे सर्व दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत.

या घटनेनंतर मीरा भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्तालयातील व्यावसायिकांनी त्यांच्याकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे संपूर्ण नाव, सध्याचा व गावचा पत्ता, ओळख पत्र व फोटो आदी सर्व माहिती घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी पुन्हा एकदा केले आहे.