शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

साहित्यासाठी उपकर लावा

By admin | Updated: August 31, 2016 03:03 IST

भाषा आणि साहित्यासाठी एखादा उपकर लावल्यास काय हरकत आहे. मराठी माणूस किमान देणगी तरी साहित्य मंडळासाठी देऊ शकेल.

बदलापूर : भाषा आणि साहित्यासाठी एखादा उपकर लावल्यास काय हरकत आहे. मराठी माणूस किमान देणगी तरी साहित्य मंडळासाठी देऊ शकेल. यादृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे. अन्यथा साहित्य संमेलन हे काही जणांसाठी व्यवसाय होईल अशी परखड टीका अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांनी केली.एका कार्यक्रमानिमित्ताने ते आले होते. तेव्हा मराठी स्वायत्त विद्यापीठास भेट दिली. तेव्हा ते पत्रकारांशी बोलत होते. काही वर्षात साहित्य महामंडळाचे काम साहित्य संमेलनापुरते केंद्रीत झाल्याने मराठी माणसांशी त्यांचा संवाद होत नाही. मराठी माणूसही साहित्य मंडळासाठी काहीही करत नाही. त्यामुळे आमच्याप्रमाणे मराठी माणूसही साहित्य महामंडळाच्या अधोगतीसाठी जबाबदार आहे असे डॉ. जोशी यांनी सांगितले. दिवसेंदिवस साहित्य संमेलनाचा वाढत जाणारा खर्च हा चिंता करण्यासारखा आहे. लेखक आणि आमंत्रितांनी स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ आणि मानधन घेणे जरी टाळले तरी संमेलनाचा खर्च ४० टक्क्यांनी कमी होऊ शकतो असे त्यांनी सांगितले. त्यात महामंडळाची आर्थिक स्थिती बेताची होण्यास ज्याप्रमाणे मंडळ जबाबदार आहे, त्याचप्रमाणे प्रकाशक, मराठी माणूसही असल्याचे त्यांनी सांगितले. प्रकाशक आपला उदरिनर्वाह मराठी साहित्याच्या भरवशावर करतात. मात्र साहित्य संमेलनासाठी किंवा महामंडळाला त्यांनी आर्थिक मदत केल्याचे ऐकीवात नाही, असे सांगून राजाश्रय घेण्यामागे ही सर्व मंडळीही जबाबदार असल्याचे जोशी यांनी स्पष्ट केले. भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी सरकारने मंडळ स्थापन केले. मात्र त्याचा निधी अनेक वर्षापासून वाढताना दिसत नाही. खर्चाचे प्रमाण वाढलेले असताना फक्त २५ लाखात संमेलन शक्य नाही. १२ कोटी महाराष्ट्रातील साहित्य चळवळीसाठी फक्त २५ लाख पुरे पडणार नाहीत असे त्यांनी नमूद केले. (प्रतिनिधी)