शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

ठाण्यात आणखी एका पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू: २४ तासातच १५ पोलीस झाले बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2020 9:42 PM

ठाणे शहर पोलीस मुख्यालयातील उपनिरीक्षक बाबा दडस यांचा कोरोनामुळे नवी मुंबईतील महात्मा गांधी मिशन मेडिकल कॉलेज अ‍ॅण्ड हॉस्पिटल (एमजीएम) रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यु झाला. आतापर्यंत १८ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देप्रमाण पुन्हा वाढलेएका अधिकाऱ्यासह १४ कर्मचाऱ्यांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे शहर मुख्यालयातील पोलीस उपनिरीक्षक बाबा दडस (४८) यांचा कोरोनावरील उपचारादरम्यान नवी मुंबईतील महात्मा गांधी मिशन मेडिकल कॉलेज अ‍ॅण्ड हॉस्पिटल (एमजीएम) रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यु झाला. आतापर्यंत १८ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांमध्ये शांतीनगरच्या एका उपनिरीक्षकासह ठाणे शहर आयुक्तालयातील १५ पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.गेल्या काही दिवसांपासून पोलिसांमध्ये कोरोनाचे प्रमाण कमी होत गेले होते. १७ आॅगस्ट रोजी नौपाडा, भोईवाडा आणि मोटार परिवहन विभागातील प्रत्येकी एक अशा केवळ तिघांना लागण झाली होती. त्यानंतर, हे प्रमाण ब-यापैकी नियंत्रणात आले होते. परंतु, गणेशोत्सव, मोहरम या सणांचा बंदोबस्त आणि अनलॉकच्या प्रक्रियेकडे वाटचाल सुरू असल्यामुळे शहरातील बाजारपेठांसह अनेक भागांमध्ये नागरिकांची वर्दळ आहे. ही गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनाही पुन्हा रस्त्यावर उतरावे लागले आहे. त्यामुळे नागरिकांच्या संपर्कामुळे शांतीनगरचे एक, तर खडकपाडा येथील दोन अधिकारी बाधित झाले. यामध्ये एका महिला अधिका-याचाही समावेश आहे. रविवारी बाधित झालेल्यांमध्ये मुख्यालयाचे तीन कर्मचारी, खडकपाडा, बाजारपेठ, बदलापूर, शिवाजीनगर, वर्तकनगर, वाहतूक शाखा आणि विठ्ठलवाडी येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. गुन्हे शाखेचे दोघेजण बाधित झाले आहेत. या सर्वांवर वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात येत आहेत. त्यांच्या संपर्कातील पोलीस आणि नागरिकांचीही माहिती घेण्यात येत आहे.*आतापर्यंत १२९ अधिकारी आणि ११७६ कर्मचारी असे एक हजार ३०५ पोलीस बाधित झाले आहेत. १०९ अधिकाºयांसह १०५५ कर्मचारी अशा एक हजार १६४ पोलिसांनी कोरोनावर मात केली असून १८ पोलिसांना जीव गमवावा लागल्याची माहिती सूत्रांनी दिली.*ठाणे शहर पोलीस मुख्यालयातील पोलीस उपनिरीक्षक बाबा दडस (४८) यांचा कोरोनावरील उपचारादरम्यान नवी मुंबईतील महात्मा गांधी मिशन मेडिकल कॉलेज अ‍ॅण्ड हॉस्पिटल (एमजीएम) कामोठे येथे ६ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. हा शहर पोलीस दलातील अठरावा मृत्यू आहे. नवी मुंबईतील कामोठे भागात वास्तव्याला असलेल्या दडस यांना २७ आॅगस्ट रोजी थंडी, अंगदुखी, सुका खोकला आणि दम लागून श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे ३० आॅगस्ट रोजी त्यांना एमजीएम रुग्णालयात दाखल केले होते. त्यांचा २ सप्टेंबर रोजी कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच रविवारी मृत्यू झाल्याची माहिती एमजीएम रुग्णालयाने दिली.

टॅग्स :thaneठाणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिस