शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
5
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
6
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
7
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
8
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
9
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
10
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
11
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
12
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
13
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
14
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
15
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
16
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
17
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
18
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
19
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
20
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

‘गायमुख’ विकासासाठी आणखी ३० कोटी

By admin | Updated: November 9, 2016 03:43 IST

ठाणे महानगरपालिकेच्यावतीने गायमुख परिसर पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यात येत असून

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्यावतीने गायमुख परिसर पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यात येत असून, त्या कामाची मंगळवारी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि आमदार प्रताप सरनाईक यांनी संयुक्तपणे पाहणी केली. यावेळी आयुक्तांनी हा प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करावी तसेच त्यासाठी आवश्यक ती वाढीव आर्थिक तरतूद करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. त्यानुसार आता यासाठी सुमारे ३० कोटींचा वाढीव निधी देण्याचे पालिकेने मान्य केले असल्याचे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले.यासाठी फेब्रुवारीच्या अखेरीस महापालिकेने १३.८ कोटींचा निधी मंजूर केला असून, जर या चौपाटीचे आधुनिकीकरणाच्या माध्यमातून सुशोभीकरण करावयाचे असेल तर अतिरिक्त पैशांची आवश्यकता असल्याचे मत मेरीटाईम बोर्डाचे कार्यकारी अभियंता मिलिंद वाणी यांनी पालिका आयुक्त आणि आमदारांच्या निदर्शनास आणले. या खाडीच्या सुशोभीकरणासाठी तसेच भविष्यात या जेट्टीवरून मिरा भार्इंदर, कल्याण डोंबिवली, भिवंडी, वसई, विरार या शहरात रो रो बोट सेवा अथवा जलवाहतूक, त्याचबरोबर इतर साहसी क्रीडा खेळ व चौपाटीचे सुशोभीकरण करावयाचे असल्यास ५२ कोटींचा वाढीव खर्च येणार असल्याची माहिती डिझायनर अरुण कुमार यांनी दिली. त्यावर आयुक्तांनी हे काम समाधानकारक सुरू असून, जर आधुनिक पद्धतीने सुशोभीकरण करायचे झाल्यास त्यासाठी २०१६-१७ या आर्थिक वर्षात ५ कोटी, व २०१७-१८ या आर्थिक वर्षात २५ कोटी वाढीव निधी देण्याचे मान्य केल्याचे सरनाईक यांनी सांगितले. मोगरपाडा तलाव आणि कासारवडवली येथील दोन तलावही तात्काळ सुशोभित करण्याचे प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना यावेळी आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.