शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

संतप्त प्रवासी उद्या करणार मूक निषेध!

By admin | Updated: February 2, 2016 01:57 IST

धनश्री गोडवे या तरुणीचा सोमवारी लोकलमधून गर्दीमुळे पडून मृत्यू झाला. यापूर्वी भावेश नकाते या तरुणाने प्राण गमावले. वरचेवर घडणाऱ्या या अपघाती मृत्यूमुळे प्रवाशांमध्ये संतापाची लाट

अनिकेत घमंडी,  डोंबिवलीधनश्री गोडवे या तरुणीचा सोमवारी लोकलमधून गर्दीमुळे पडून मृत्यू झाला. यापूर्वी भावेश नकाते या तरुणाने प्राण गमावले. वरचेवर घडणाऱ्या या अपघाती मृत्यूमुळे प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली असून रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या निषेधाचे ‘ऊठ डोंबिवलीकर’ असे शीर्षक असलेले व्हॉट्सअ‍ॅप संदेश फिरू लागले आहेत. बुधवारी ३ फेब्रुवारी रोजी सकाळी डोंबिवलीकर प्रवासी व संघटनांच्या वतीने रामनगर तिकीट खिडकीजवळ मूक निषेध आंदोलन करण्यात येणार आहे.रेल्वेमंत्री प्रभू यांचे छायाचित्र असलेला ‘मुर्दाड रेल मिनिस्ट्री’ आणि सफेद कपडे पांघरून ठेवलेला ‘सामान्य रेल्वे प्रवासी’ असा संदेश धनश्रीच्या फोटोसह दिवसभर हजारो डोंबिवलीकरांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर फिरत होता. त्यासोबत, ऊठ डोंबिवलीकर आता तरी जागा हो... अजून किती तरुणांचे बळी घेणार ही रेल्वे? असा सवाल करणारे मेसेजही लोकांमध्ये चर्चेत होते. त्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीमधील काही प्रतिष्ठित नागरिक, प्रवासी संघटना यांनी बुधवारच्या मूक आंदोलनाची घोषणा केली. नकाते यांच्या मृत्यूनंतरही डोंबिवलीकर आक्रमक झाले व त्यांनी आंदोलन केले होते. मात्र, डोंबिवलीकरांचा रेल्वे प्रशासनाविरुद्धचा आक्रोश प्रभू यांच्या कानांवर जात नसल्याने या वेळी मूळ निदर्शनांचा पर्याय स्वीकारल्याचे प्रवासी संघटनांनी सांगितले.महिलांकरिता अतिरिक्त महिला स्पेशल लोकल दिल्या जात नाहीत. बाहेरगावांहून येणाऱ्या गाड्यांतून प्रवास करण्याची मुभा महिला प्रवाशांना देताना या गाड्यांची वेळ ही भल्या पहाटे आहे, हे लक्षात घेतले जात नाही. या साऱ्यातून महिला प्रवाशांच्या समस्यांबाबत रेल्वे प्रशासन उदासीन असल्याचेच लक्षण आहे. धनश्रीचा मृत्यू त्याच मुर्दाड मानसिकतेमधून झाल्याचे महिला प्रवाशांना वाटते.मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजेश कदम यांच्यासह भाजपाचे आमदार रवींद्र चव्हाण आणि नगरसेवक पदाधिकारी आदींनी या आंदोलनास पाठिंबा दिला आहे. दररोज होणारे अपघात व तरुण-तरुणींसह अनेकांचे होणारे मृत्यू रेल्वेच्या ढिसाळ व नियोजनशून्य कारभाराचे बळी आहेत, असे प्रवाशांचे म्हणणे आहे. डोंबिवलीकरांच्या यातना- भावना दिल्लीदरबारी पोहोचवण्याचा हा प्रयत्न असेल. - मनोहर शेलार, अध्यक्ष प्रवासी संघटनामहिला प्रवाशांना होणाऱ्या त्रासाबद्दल सातत्याने रेल्वे प्रशासनाच्या कानीकपाळी ओरडून काहीही फरक पडत नाही. महिला विशेष लोकल द्या, या मागणीला केराची टोपली दाखवली जाते, हे योग्य नाही. अजून किती बळी घेतले जाणार आहेत. यापुढे असे मृत्यू खपवून घेतले जाणार नाहीत. - लता अरगडे, डोंबिवलीजेवढ्या गाड्या वाढवल्या आहेत, त्यामध्ये मुख्य मार्गावर गाड्या नाहीत, हे योग्य नाही. रेल्वेमंत्र्यांसह पालकमंत्र्यांना अपघातांचे गांभीर्य नाही. ते स्वत: वातानुकूलित दालनात बसतात. त्यांना प्रवाशांच्या व्यथा काय समजणार.- जितेंद्र विशे, डोंबिवलीकेवळ डोंबिवलीच नाहीतर बदलापूर, अंबरनाथ आणि आता आसनगाव येथील प्रवाशांचेही प्रचंड हाल होत आहेत. प्रवाशांच्या भावनांशी कोणी खेळू नये. त्यांचा अंत बघू नये. जोपर्यंत तो शांत आहे, तोपर्यंत ठीक आहे. अन्यथा, दिवा येथे झाला तसा उद्रेक व्हायला वेळ लागणार नाही. - संजय मेस्त्री