शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
3
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
4
सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल
5
'नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा नक्कीच पंतप्रधान होतील, आम्हालाही त्यांच्यासारख्या नेत्याची गरज; पाकिस्तानी अब्जाधीशांनी केले कौतुक
6
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र
7
'अनिल कपूरसारखा पती नको' असं का म्हणाली होती माधुरी दीक्षित? इंटरेस्टिंग आहे यामागचं कारण
8
Gemology: भाग्यरत्न घातल्याने खरोखरंच भाग्य बदलते का? कोणत्या रत्नाचा काय प्रभाव पडतो जाणून घ्या!
9
राज ठाकरेंच्या पाठिंब्यानं महायुतीला बळ; भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे 'शिवतीर्थ'वर
10
Video - ना स्ट्रेचर, ना कोणाची मदत; आजारी वडिलांना उचलून घेऊन रुग्णालयात फिरत राहिला लेक
11
सूर्यावर भीषण स्फोट; ISROच्या आदित्य L-1 आणि चांद्रयान-2 च्या कॅमेऱ्यात कैद
12
IPL मुळे भारताच्या वाट्याला T20 WC पूर्वी १ सराव सामना; दोन बॅचमध्ये संघ अमेरिकेला जाणार
13
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
14
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
15
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
16
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?
17
तुमच्या स्मार्टफोनसाठी कोणता स्क्रीन गार्ड बेस्ट; 50 रुपयांपासून मिळतात, पण...
18
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
19
निखळ सौंदर्यानं अभिनेत्रींना देते मात; सरकारी अधिकारी अन् मोफत उपचार करणारी डॉक्टर
20
१०० वर्षांनी अद्भूत त्रिग्रही योग: ५ राशींना शुभ, धनलाभाची संधी; नोकरीत प्रगती, उत्तम काळ!

रेल्वेनंतर शाळा परिसरातल्या फेरीवाल्यांनासुद्धा हटवा; अन्यथा पुन्हा खळ्ळ खट्याक, मनविसेचा पालिकेला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2017 4:43 PM

भाईंदर - मनसेने मुंबईसह ठाणे, मीरा-भार्इंदर रेल्वे परिसरात बेकायदेशीरपणे ठाण मांडणाऱ्या फेरीवाल्यांवर खळ्ळ खट्याक केल्यानंतर आता मीरा-भार्इंदरमधील शाळेच्या परिसरात बसणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्यांना हटवा, अशी मनसेची मागणी आहे.

भाईंदर - मनसेने मुंबईसह ठाणे, मीरा-भार्इंदर रेल्वे परिसरात बेकायदेशीरपणे ठाण मांडणाऱ्या फेरीवाल्यांवर खळ्ळ खट्याक केल्यानंतर आता मीरा-भार्इंदरमधील शाळेच्या परिसरात बसणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्यांना हटवा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने (मनविसे) पालिकेकडे करून अन्यथा पुन्हा खळ्ळ खट्याक केले जाईल, असा इशारा पालिकेला दिला आहे.पालिका हद्दीत अनेक पालिका तसेच खासगी शाळा आहेत. या बहुतांशी शाळांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर फेरीवाले आपले बस्तान मांडून विद्यार्थी, शिक्षक व पालकांना शाळेत ये-जा करण्यास अडचण निर्माण करतात. काही शाळांच्या परिसरातील वाहतुकीचा रस्ताही फेरीवाल्यांकडून व्यापला जातो. त्यामुळे शाळा भरण्याच्या तसेच सुटण्याच्या वेळेत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. याविरोधात अनेकदा तक्रारी करूनही त्याकडे प्रशासनाने केवळ राजकीय दबावासह आर्थिक तडजोडीपोटी दुर्लक्ष केले आहे. काही फेरीवाल्यांनी तर आपण आठवड्याला २०० ते ३०० रुपये हप्ता देत असल्याचे सांगून तेथून हटण्यास नकार दिल्याने फेरीवाल्यांच्या विस्तारात आर्थिक तडजोड असल्याचेच स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शाळा परिसरातील फेरीवाल्यांच्या बेकायदेशीर गर्दीत अपघाताची शक्यता बळावते.अशा संभाव्य घटना टाळण्यासाठी मनसेने ज्याप्रमाणे मीरा रोड रेल्वे परिसरात ठाण मांडणाऱ्या फेरीवाल्यांना हुसकावुन लावले. त्याच धर्तीवर पालिकेने शाळा परिसरात बेकायदेशीर ठाण मांडणाऱ्या फेरीवाल्यांना १५ दिवसांत हटवावे. तसेच शाळेचा १०० मीटरपर्यंतचा परिसर मोकळा ठेवावा, अशी मागणी मनविसेने पालिकेकडे केली आहे. तसे न झाल्यास पुन्हा खळ्ळ खट्याक केले जाईल, असा इशारा दिला आहे. तसे निवेदन सहाय्यक आयुक्त स्वाती देशपांडे यांना देण्यात आले. त्यावेळी मनविसेचे शहर सचिव शान पवार, विभागीय सचिव प्रमोद देठे, गणेश बामणे, दादा कदम, साई परब, वैभव ओझा, महेश चव्हाण, इरफान सय्यद, सुनील लोखंडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकhawkersफेरीवालेMNSमनसे