शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
2
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
3
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
4
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
5
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
6
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
7
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
8
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत
9
बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप
10
शेतकरी कर्जमाफीची रक्कम ६ आठवड्यांत लाभार्थ्यांना द्या; औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश
11
महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश
12
लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य
13
कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका
14
पाकच्या हवाई हल्ल्यांत तीन अफगाण क्रिकेटपटू ठार; युद्धविराम भवितव्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह
15
‘पणत्या, मेणबत्त्यांवर खर्च कशाला? नाताळाकडून शिका’, अयोध्येतील दीपोत्सवावरून अखिलेश यादवांचा टोला 
16
Fake News: रेल्वेबद्दल 'फेक न्यूज' पोस्ट करताय? सावधान! रेल्वेने उचलले मोठे पाऊल
17
"हा भ्याड हल्ला!" अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युवर बीसीसीआयची संतप्त प्रतिक्रिया
18
Ind Vs Aus: पर्थवर विराट-रोहित कमाल दाखवणार? रेकॉर्ड रचणार? हे ७ विक्रम RO-KOच्या निशाण्यावर
19
Birhad Morcha: बिर्हाड मोर्चा मुंबईच्या वेशीवर, कसारा घाटात ठिय्या आंदोलन, प्रमुख मागण्यांसाठी एल्गार!
20
काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या कारला अपघात, एस्कॉर्ट वाहनावर आदळली कार

महायुतीतील तिन्ही पक्षांना लागले स्वबळाचे डाेहाळे; ठाणे महापालिकेत भाजपचा ‘अब की बार ७० पार’ नारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 09:01 IST

इच्छुक उमेदवारांच्या मार्गदर्शन शिबिरात कार्यकर्त्यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : महायुतीतील मित्रपक्ष भाजप आणि शिंदेसेनेकडून ठाण्यात स्वबळावर लढण्याची चाचपणी सुरू केली असून, भाजपच्या गुरुवारी झालेल्या इच्छुक उमेदवारांच्या मार्गदर्शन शिबिरात कार्यकर्त्यांनी ‘अब की बार ७० पार’ असा नारा देत स्वबळावर लढण्याची मागणी केली.  

ठाणे शहरातील १८ मंडळांमधून तब्बल ४१६ इच्छुक उमेदवारांनी या शिबिरात सहभाग नोंदवला. या मार्गदर्शन शिबिरात आ. संजय केळकर, आ. निरंजन डावखरे तसेच शहराध्यक्ष संदीप लेले यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. उमेदवारांना संघटन बळकट करणे, प्रचार तंत्र, मतदारांशी थेट संवाद आणि प्रभागनिहाय नियोजन या बाबींचे मार्गदर्शन केले. 

भाजपची जिल्ह्यात ताकद वाढली आहे. आमदारही भाजपचे अधिक आहेत. त्यामुळे आता कार्यकर्त्यांच्याही मनाचा विचार करावा लागणार असल्याचे मत आ. केळकर यांनी व्यक्त केले. 

‘कार्यकर्त्यांना संधी मिळावी’भाजपचे जिल्हाध्यक्ष लेले यांनी शिबिरातील घोषणांबाबत स्पष्टीकरण देताना म्हटले, युती हवी की नको, याचा निर्णय वरिष्ठ स्तरावर घेतला जातो. इच्छुक उमेदवारांची माहिती घेणे आणि परिचय पत्र भरणे ही नियमित संघटनात्मक प्रक्रिया आहे. ‘अब की बार ७० पार’ हा नारा हा कार्यकर्त्यांच्या उत्साहाचा भाग आहे. याचा युतीच्या निर्णयाशी काहीही संबंध नसल्याचे ते म्हणाले. आम्ही युती तोडणारे नाहीत, परंतु पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काम केले. आता कार्यकर्त्यांना संधी मिळावी, अशी त्यांची इच्छा आहे.

महापालिकेतील निर्णय ठाणेकरांच्या हितासाठी असावेतशिंदेसेनेचे खा. नरेश म्हस्के यांनी घेतलेल्या बैठकीबाबत त्यांना विचारले असता, जोर बैठका या सुरूच राहतात, असे त्यांनी सांगितले. मात्र, पालिकेतील निर्णय ठाणेकरांच्या हितासाठी असावेत, जेथे भ्रष्टाचार, अन्याय दिसेल तिथे आम्ही ठामपणे लढू, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Alliance parties eye solo runs; BJP's 'Ab ki baar 70 paar' in Thane.

Web Summary : BJP explores contesting Thane Municipal Corporation elections independently, fueled by workers' 'Ab ki baar 70 paar' slogan. Guidance camp held for aspirants, focusing on strengthening organization and voter outreach. Alliances depend on senior leaders' decisions. Shiv Sena emphasizes decisions should benefit Thane residents.
टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाElectionनिवडणूक 2024