शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

एकटेपणाला कंटाळून पळालेला अक्षय स्वगृही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2020 01:45 IST

पोटचा पोर परत मिळाल्याने त्या माता-पित्याने सोमवारी सकाळी ठाणे रेल्वेस्थानक गाठून आरपीएफचे आभार मानले.

ठाणे : आईवडील दोघेही कामाला जातात. त्यामुळे शाळेतून आल्यावर एकट्याला रिकामे असलेले घर खाते. त्या दोघांपैकी दुपारी कोणीच घरात नसल्याने घर नकोसे झाल्याने भांडूपमधील अकरा वर्षीय अक्षय याने (नाव बदलेले आहे) घरातून पलायन केल्याची धक्कादायक बाब समोर आली. ठाणे रेल्वेस्थानक ात रविवारी तो घुटमळताना आढळल्याने ठाणे रेल्वे सुरक्षा बल पोलिसांनी विचारपूस करून त्यास रात्रीच पालकांच्या स्वाधीन केले. पोटचा पोर परत मिळाल्याने त्या माता-पित्याने सोमवारी सकाळी ठाणे रेल्वेस्थानक गाठून आरपीएफचे आभार मानले.रविवारी ठाणे आरपीएफचे पोलीस उपनिरीक्षक नवीन सिंह, पोलीस कॉन्स्टेबल भास्कर सावंत आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाचे सुरक्षारक्षक विजय ठोकले हे रेल्वेस्थानकावर गस्त घालत होते. याचवेळी त्यांना एक लहान मुलगा बराच वेळ एकाच ठिकाणी एकटा घुटमळताना दिसून आला. त्यामुळे आरपीएफ जवानांनी त्याचा विश्वास संपादन करून विचारणा केली. त्यावेळी, त्याने तो भांडूप येथे राहणारा असून त्याची आई त्याला ठाणे रेल्वेस्थानकात सोडून गेल्याचे त्याने सांगितले. त्यांच्या त्या बोलण्यावर संशय आल्याने त्याला तातडीने ठाणे आरपीएफ ठाण्यात आणले. त्यावेळी त्याने जो पत्ता सांगितला. त्याच परिसरात महाराष्टÑ सुरक्षा बल सुरक्षारक्षक ठोकल हे भांडूप येथे राहणारे असल्याने त्यांना त्या परिसराची बऱ्यापैकी माहिती होती. त्यानुसार त्यांच्यामार्फत त्या परिसरात अक्षयबाबत चौकशी केल्यावर त्याच्या पालकांची ओळख पुढे आली. त्यांना याबाबत माहिती देऊन त्याला रात्रीच त्यांच्या स्वाधीन केले. नंतर सोमवारी सकाळी पालकांनी ठाणे आरपीएफ पोलीस ठाणे गाठून पोलिसांचे आभार मानले.आईवडील कामावर जात असल्याने घरात थांबणे झाले होते नकोसेठाणे आरपीएफ पोलिसांना अक्षय याच्याकडे १ हजार ५०० रुपये आणि एका मॉलमध्ये चॉकलेट खरेदीचे बिल मिळाले. तसेच बोलताना त्याने आईवडिल हे दोघेही कामाला जातात. त्यामुळे घरात बराच वेळ एकटा असतो.घरात कोणी नसल्याने घर सोडण्याचा विचार केला. त्यानुसार रविवारी घरातील पैसे घेऊन निघालो. सुरुवातीला एका मॉलमध्ये जाऊन तेथे चॉकलेट खरेदी केले. घरात कोणी नसल्याने घर सोडण्याचा विचार केला.त्यातील काही पैसे मित्राकडे ठेवले. कुठे जायचे हे माहित नव्हते. तरीही हिम्मत करून लोकलमध्ये बसून ठाणे रेल्वेस्थानकात आलो. येथे खरेदी केलेले चॉकलेट संपवले, असे त्याने सांगितल्याची माहिती आरपीएफ पोलिसांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेFamilyपरिवार