शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
3
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
4
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
5
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
6
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
7
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
8
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
9
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
10
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
11
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
12
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
13
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
14
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
15
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
16
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
17
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
18
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
19
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
20
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

१३ वर्षांनंतर दोन अधिकारी दोषमुक्त

By admin | Updated: January 25, 2016 01:17 IST

तत्कालीन नालासोपारा नगरपालिकेच्या दोन अधिकाऱ्यांची अनेक आरोप ठेवून विभागीय चौकशी केली गेली. चौकशी अधिकाऱ्याला माहिती देण्यासाठी नेमलेले तब्बल

शशी करपे,  वसईतत्कालीन नालासोपारा नगरपालिकेच्या दोन अधिकाऱ्यांची अनेक आरोप ठेवून विभागीय चौकशी केली गेली. चौकशी अधिकाऱ्याला माहिती देण्यासाठी नेमलेले तब्बल तीन अधिकारी निलंबित झाले. तर, सरकारी साक्षीदार उलटल्याने तब्बल १३ वर्षांनंतर चौकशी अहवाल तयार झाला. चौकशी अधिकाऱ्याने दोघांना दोषमुकत केले. मात्र, शिवसेनेने आक्षेप घेतल्यामुळे क्लीन चिट असलेला अहवाल आता पुढच्या महासभेत मांडला जाणार आहे.तत्कालीन नालासोपारा नगरपालिकेचे सुखदेव दरवेशी यांच्यावर डिझेल व पेट्रोल वापरात गैरव्यवहार, साफसफाई ठेकेदारांना पाठीशी घालून नगरपालिकेचे नुकसान करणे, गटाराचा स्लॅब तोडून नगरपालिकेचे नुकसान करणे, कालबाह्य औषधांची खरेदी, विशेष सर्वसाधारण समित्यांचे ठराव व टिप्पण्या वेळेत सादर न करणे, वर्तणूक नियमांचा भंग करणे, निलंबित काळात अपप्रचार करणे आदी सात आरोप ठेवण्यात आले होते. काही काळ निलंबनाची कारवाईही करण्यात आली होती. दोषारोप १९९९ पासून विविध आरोपाखाली करण्यात आले होते. याप्रकरणी दरवेशी यांची विभागीय चौकशी सुरू होती. तत्कालीन नालासोपारा नगरपालिकेच्या सहायक अंतर्गत लेखापरीक्षक संध्या सबनीस यांच्यावर कर्मचाऱ्यांनी मालमत्ता कराची अफरातफर केली असताना पर्यवेक्षकपदाची जबाबदारी पार न पाडणे, कर्तव्यात कसूर करणे, कर्मचाऱ्यांना आर्थिक अनियमितता राखण्यासाठी पूरक स्थिती निर्माण करणे, पदाचा गैरवापर करून सहकारी कर्मचाऱ्यांना त्रास देणे आदी चार आरोप ठेवण्यात आले होते. सदरचे दोषारोप २००३ सालापासून वेगवेगळ्या आरोपांखाली करण्यात आले होते. त्यानंतर, सबनीस यांची विभागीय चौकशी सुरू होती.दोन्ही अधिकाऱ्यांवर १३ वर्षांहून अधिक काळ दोषारोप असल्याने मनपाने याप्रकरणी विभागीय चौकशी करण्यासाठी २ जानेवारी २०१४ रोजी सेवानिवृत्त सहसचिव प्र.मा. माळवदकर यांची चौकशी समिती नेमली होती. या समितीचा अहवाल पालिकेला आल्यानंतर तो महासभेपुढे ठेवण्यात आला होता. दोन्ही अधिकाऱ्यांची चौकशी सुरू झाल्यानंतर पालिकेने प्रभारी सहायक आयुक्त सुरेंद्र यांची सादरकर्ता अधिकारी म्हणून नेमणूक केली होती. चौकशी सुरू असताना पंडित यांना निलंबित करण्यात आल्याने त्यांच्याजागी प्रभारी सहायक आयुक्त जितेंद्र चौधरी यांची नेमणूक करण्यात आली होती. चौधरी यांना अ‍ॅण्टीकरप्शनने अटक केल्याने त्यांना निलंबित करण्यात आले होते. म्हणून त्यांच्याजागी सादरकर्ता अधिकारी म्हणून सहायक आयुक्त सुरेश थोरात यांची नेमणूक करण्यात आली होती. काही काळ लोटल्यानंतर थोरातांना अनधिकृत बांधकामप्रकरणी निलंबित करण्यात आले. यामुळे चौकशीचे काम रेंगाळून पडले.एकीकडे सादरकर्ता अधिकारी एकापाठोपाठ एक निलंबित होत असताना सरकारी साक्षीदार असलेले पालिकेतील अधिकारी-कर्मचारी या दोन्ही अधिकाऱ्यांच्या आरोपाबाबत माहिती देऊ शकले नाहीत. सर्वच साक्षीदारांनी प्रकरणे खूप जुनी आहेत. आम्हाला काही माहिती नाही, अशीच साक्ष दिली. तर, सर्वच सादरकर्ता अधिकारी कोणतेच ठोस पुरावे सादर करू शकले नाहीत. त्यामुळे चौकशी अधिकारी माळवदकर यांनी दोन्ही अधिकाऱ्यांना सर्व आरोपांमधून दोषमुक्त केले. हा अहवाल पालिकेच्या सभेत आल्यानंतर सेना गटनेते धनंजय गावडे यांनी आक्षेप घेत फेरचौकशीची मागणी केली. सादरकर्ते आणि साक्षीदार दोन्ही अधिकाऱ्यांचे सहकारी असल्याने पुरावे मिळणे कठीण आहे.