शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

रिक्षास्टॅण्डच्या नावाखाली मोक्याच्या जागा जाहिरातदारांस १५ वर्षे आंदण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 1:06 AM

खासगीकरणाचा असाही कट । महापालिकेचे कोट्यवधींचे नुकसान

ठाणे : आधीच शहराच्या विविध भागांत उभारण्यात येत असलेल्या ठिकाणी जाहिरातींचे हक्क प्रदान करून पालिकेने अनेक जागा मोफत स्वरूपात अनेक जाहिरातदारांना आंदण दिल्या आहेत. असे असताना आता महापालिका आता २५ ठिकाणी रिक्षास्टॅण्ड उभारण्याकरिता नगरसेविका परिषा सरनाईक यांच्या विहंग चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेसोबत मे. शुभांगी अ‍ॅडव्हर्टायझिंग अ‍ॅण्ड मार्केटिंग कंंपनीला १५ वर्षांकरिता या मोक्याच्या जागा देणार आहे.या स्टॅण्डच्या दर्शनी भागावर जाहिरातींचे हक्क एजन्सीला देण्यात येणार असून त्यातून महापालिका केवळ जाहिरात फीच वसूल करणार आहे. त्यामुळे बसथांबे, शौचालये, विजेचे पोल यापाठोपाठ आता रिक्षास्टॅण्डचे एक प्रकारे खासगीकरण करून पुन्हा जाहिरातदारांची खळगी भरण्याचा महापालिका प्रशासनाचा कट असल्याचा आरोप होत आहे.

यासंदर्भातील प्रस्ताव येत्या बुधवारच्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे. विहंग चॅरिटेबल ट्रस्ट ही संस्था सध्या लोकोपयोगी उपक्रमांतर्गत कर्करोगासारख्या आजारावर उपचार करण्यासाठी गरजूंना विशेषत: रिक्षाचालकांना आर्थिक मदत करत आहे. त्यानुसार, मे. शुभांगी अ‍ॅडव्हर्टायझिंग अ‍ॅण्ड मार्केटिंगच्या मदतीने ही सर्व सोयीसुविधायुक्त स्टॅण्ड उभे राहिल्यास त्याठिकाणी दुपारच्या वेळेस भोजन करण्याबरोबरच रिक्षाचालकांना थोडी विश्रांतीही मिळेल, असे भासवून ही परवानगी या संस्थेने मागितली आहे. संस्थेचा उद्देश चांगला असला, तरी जाहिरातीपोटी मिळणारे उत्पन्न हे कोट्यवधींच्या घरात आहे. त्यातून किती रिक्षाचालकांना खरोखरच याचा फायदा होईल, हे सांगणे कठीण आहे.

या प्रत्येक रिक्षास्टॅण्डवर १५ बाय ६ मोजमापाचा १ व ४ बाय ६ मोजमापाचा एक जाहिरात फलक लावण्यास परवानगी देऊन मोक्याच्या जागा १५ वर्षे जाहिरातदारांच्या घशात घालण्याचा कट प्रशासनाने रचला आहे. यामधून केवळ जाहिरात फीच वसूल केल्याने महापालिकेचे कोट्यवधींचे नुकसान होणार असून यातून संस्था किती नफा कमावणार, याचा साधा उल्लेखही नसल्यामुळे या प्रस्तावावरूनही महासभेत वादंग होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

या मोक्याच्या जागा जाणार जाहिरातदारांच्या घशातयानुसार शहरातील वृंदावन, मानपाडा, कॅडबरीनाका, माजिवडानाका, गांधीनगर, खेवरा सर्कल, टिकुजिनीवाडीस बाळकुमनाका, कोलशेत हायलॅण्ड स्प्रिंग प्रोजेक्ट, कासारवडवलीनाका, स्वस्तिक प्लाझा, कोरम मॉल, माजिवडा लोढा रुस्तमजी रोड, आर मॉल घोडबंदर, तीनहातनाका, इटर्निटी मॉल, पाचपाखाडी, हरिनिवास सर्कल, ब्रह्मांड सर्कल, हिरानंदानी इस्टेट, वाघबीळ जंक्शन, खोपट, तीनहातनाका टिपटॉप प्लाझाजवळ अशा तब्बल २५ मोक्याच्या ठिकाणी महापालिका या संस्थेला जागा उपलब्ध करून देणार आहे.

टॅग्स :auto rickshawऑटो रिक्षाThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका