सुशील मोरेकर, अरविंद खांबल यांची साहसी मोटारसायकल यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:48 IST2021-09-07T04:48:23+5:302021-09-07T04:48:23+5:30

ठाणे : श्री आनंद भारती समाज, ठाणे व फ्रेंडशिप क्रिकेट क्लब ठाणे यांचे ज्येष्ठ सदस्य सुशील नारायण मोरेकर आणि ...

Adventurous motorcycle journey of Sushil Morekar and Arvind Khambal | सुशील मोरेकर, अरविंद खांबल यांची साहसी मोटारसायकल यात्रा

सुशील मोरेकर, अरविंद खांबल यांची साहसी मोटारसायकल यात्रा

ठाणे : श्री आनंद भारती समाज, ठाणे व फ्रेंडशिप क्रिकेट क्लब ठाणे यांचे ज्येष्ठ सदस्य सुशील नारायण मोरेकर आणि हॉटेल संचालक अरविंद खांबल या मित्रांनी १९ दिवसांची ६५०० कि.मी. लांबीची ठाणे ते लडाख अशी साहसी मोटारसायकल यात्रा पूर्ण केली. १३ ते ३१ ऑगस्टदरम्यान ही यात्रा पार पडली.

या मोहिमेबद्दल मोरेकर म्हणाले की, मी बॅकसीटर असलो तरी मित्राला साथ दिली. खांबल म्हणाले की, ठाण्याहून लडाख मोटारसायकलवरून सर करायचे हा माझा संकल्प १२ वर्षे होता, पण तीन महिन्यांत पूर्वतयारी पूर्ण करून सुशीलच्या साथीने माझी स्वप्नपूर्ती झाली. श्री आनंद भारती समाज संस्थेचे अध्यक्ष रमाकांत कोळी, कार्याध्यक्ष हरेश्वर मोरेकर, उपाध्यक्ष प्रकाश ठाणेकर, फ्रेंडशिप क्रिकेट क्लबचे ज्येष्ठ क्रिकेटपटू मदन नाखवा, शरद सप्रे, क्लबचे चिटणीस प्रल्हाद नाखवा, सहचिटणीस बळवंत सकपाळ, कोळी कम्बाइन्ड इलेव्हन क्रिकेट क्लबचे अध्यक्ष परेश नाखवा आदी मान्यवरांनी मोरेकर आणि खांबल यांचे अभिनंदन केले.

-------------------

लडाख शिखरावर तिरंग्याला वंदन करताना अरविंद खांबल व सुशील मोरेकर.

Web Title: Adventurous motorcycle journey of Sushil Morekar and Arvind Khambal