शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
2
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
3
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
4
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
5
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
6
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
7
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
8
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
9
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
10
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
11
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
12
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
13
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
14
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
15
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
16
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
17
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
18
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
19
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
20
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांव्यतिरिक्त उमेदवारही अर्ज भरू शकतो!

By admin | Updated: January 13, 2017 06:48 IST

कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा दुसरा दिवस आहे.

सुरेश लोखंडे / ठाणेकोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा दुसरा दिवस आहे. या आमदारकीसाठी ३ फेब्रुवारीरोजी मतदान होणार आहे. यासाठी इच्छुक असलेला उमेदवार हा शिक्षकच असावा, अशी कोणत्याही प्रकारची अट नाही. यामुळे शिक्षकांव्यतिरिक्त इतर उमेदवारदेखील उमेदवारी अर्ज भरू शकतो, असे येथील उपजिल्हा निवडणूक अधिकारी फरोग मुकादम यांनी सांगितले.या निवडणुकीसाठी १७ जानेवारीपर्यंत नामनिर्देशनपत्र उमेदवारांना भरता येणार आहे. कोकण विभागीय आयुक्त या निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी असल्यामुळे बेलापूर येथील त्यांच्या कार्यालयात इच्छुकांना उमेदवारी दाखल करायची आहे. मात्र, गुरुवारी दुसऱ्या दिवशीदेखील उमेदवारी एकही अर्ज दाखल झालेला नाही. १४ जानेवारीच्या मकरसंक्रांतीनंतरच उमेदवारी अर्ज दाखल होतील, अशी चर्चा ऐकायला मिळत आहे. यासाठी शिक्षक असलेल्या व्यक्तीलाच उमेदवारी अर्ज भरता येतो, असा गैरसमज पसरवला जात असल्याची चर्चा आहे. यास अनुसरून मुकादम यांना विचारणा केली असता कोणत्याही पात्र व्यक्तीस नामनिर्देशनपत्र दाखल करता येईल, असे सूतोवाच केले. माध्यमिक, उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालय आदींमधील शिक्षक, प्राध्यापक या निवडणुकीच्या मतदानासाठी पात्र आहेत. या निवडणुकीसाठी ३७ हजार ६४४ मतदार आहेत. त्यात ठाणे जिल्ह्यातील १५ हजार ७६३ मतदारांचा समावेश आहे. या मतदारांची अधिकृत मतदारयादी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, तहसीलदार, महापालिका, नगरपालिका आदी सरकारी कार्यालयांच्या आवारात सर्वांना पाहण्यासाठी ठेवल्या आहेत. कोकण विभागात ९८ मतदान केंद्रे आहेत. यामध्ये रायगड जिल्ह्यात सर्वाधिक २८, तर त्याखालोखाल ठाणे जिल्ह्यात २१ मतदान केंद्रे आहेत. पालघरला १३, रत्नागिरीला १७ आणि सिंधुदुर्गसाठी १९ मतदान केंदे्र घोषित केली आहेत.