अतिक्रमणांवर कारवाई! भाजपा नगरसेवकाची अधिकाऱ्यांना शिवीगाळ; CRZ मधील बांधकामे तोडण्यापासून रोखले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 07:02 IST2026-02-14T07:02:04+5:302026-02-14T07:02:18+5:30

अधिकारी-कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत कारवाई बंद पाडली. नगरसेवकच विरोध करत असल्याने पालिकेचे पथक तिकडून निघून गेले.

Action against encroachments in Mira Bhayndr! BJP corporator abuses officials; Stopped from demolishing constructions in CRZ | अतिक्रमणांवर कारवाई! भाजपा नगरसेवकाची अधिकाऱ्यांना शिवीगाळ; CRZ मधील बांधकामे तोडण्यापासून रोखले

अतिक्रमणांवर कारवाई! भाजपा नगरसेवकाची अधिकाऱ्यांना शिवीगाळ; CRZ मधील बांधकामे तोडण्यापासून रोखले

मीरा रोड - भाईंदर येथील सरकारी जागा आणि सीआरझेड क्षेत्रात झालेल्या अनधिकृत बांधकामावर शुक्रवारी कारवाईसाठी गेलेल्या मीरा-भाईंदर महापालिकेच्या पथकाला नगरसेवकासह अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांचा विरोध सहन करावा लागला. भाजप नगरसेवक अशोक तिवारी यांनीच कारवाई थांबवून पालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांना अर्वाच्च शिवीगाळ, दमदाटी केली. 

भाईंदर पश्चिमच्या जय अंबेनगर येथे शुक्रवार, १३ फेब्रुवारी रोजी अनधिकृत बांधकामावर कारवाईसाठी महापालिका प्रभाग अधिकारी लॉरेटा घाडगे, कनिष्ठ अभियंता संदीप साळवे, फेरीवाला पथक प्रमुख मयूर भोईर यांच्यासह पालिका कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान गेले होते. सरकारी जागा आणि सीआरझेडमध्ये अनधिकृत बांधकामे असल्याने येथील दोन वाढीव मजल्याची बांधकामे सुरू असताना ती पाडण्यास गेलेल्या पालिका पथकाला अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांसह स्थानिक भाजप नगरसेवक अशोक तिवारी यांनी विरोध केला आणि कारवाई बंद करायला लावली.

अधिकारी-कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत कारवाई बंद पाडली. नगरसेवकच विरोध करत असल्याने पालिकेचे पथक तिकडून निघून गेले. या घटनेचे व्हिडीओ व्हायरल होताच भाजप आणि तिवारी यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. याप्रकरणी नगरसेवक अशोक तिवारी यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करावा व त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची कारवाई करावी, अशी मागणी सत्यकाम फाउंडेशनचे अध्यक्ष ॲड. कृष्णा गुप्ता व अन्य यांनी केली आहे. 

आपल्याच नगरसेवकावर कारवाई करणार का?
विशेष म्हणजे ११ फेब्रुवारीला महापौर दालनाचा पदभार स्वीकारताच महापौर डिम्पल मेहता यांनी पालिका आयुक्तांना पत्र लिहून नवीन अनधिकृत बांधकाम खपवून घेणार नाही, असे सांगत जबाबदार अधिकारी-कर्मचारी यांच्यावर कारवाईची मागणी चालवली होती. आता मात्र खुद्द त्यांच्याच नगरसेवकाने अनधिकृत बांधकामावरील कारवाई रोखल्याने आता महापौर स्वतःच्या नगरसेवकावर कारवाई करणार का, याची चर्चा आहे.

Web Title : अतिक्रमण पर कार्रवाई रुकी; भाजपा पार्षद ने अधिकारियों को गाली दी, तोड़फोड़ रोकी

Web Summary : मीरा-भायंदर: भाजपा पार्षद ने अवैध CRZ निर्माणों को तोड़ने से रोका और अधिकारियों को गाली दी। घटना वायरल होने के बाद जांच की मांग की गई। महापौर ने अवैध निर्माण के खिलाफ कार्रवाई का वादा किया था।

Web Title : Action Against Encroachments Halted; BJP Corporator Abuses Officials, Blocks Demolition

Web Summary : Mira-Bhayandar: A BJP corporator halted demolition of illegal CRZ constructions, abusing officials. An inquiry is demanded after the incident went viral. The mayor had pledged action against illegal construction.