- सदानंद नाईक उल्हासनगर - कल्याण ते अंबरनाथ रस्त्यावरील जय अंबे ऑटो गॅरेजच्या तोडफोड प्रकरणी भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यासह ७ जणावर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. एका आठवड्यांनंतर यातील तीन आरोपीना पोलिसांनी ताब्यात घेवून, नोटीसी देत सोडून देण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांनी दिली.
उल्हासनगर कॅम्प नं-३, कल्याण ते अंबरनाथ मुख्य रस्त्यावर जय अंबे ऑटो गॅरेज आहे. रामराज जयस्वार यांनी हे गॅरेज गुरप्रीत कौर उर्फ पूजा विजय पठारे यांच्याकडून भाड्याने घेतले. ऐण दसऱ्याच्या दिवसी एका टोळक्याने गॅरेजची तोडफोड केली. जयस्वार यांच्या तक्रारीवरून एकूण ७ जणावर मध्यवर्ती पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी मध्ये दोन भाजपा पदाधिकाऱ्याचा समावेश आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक विठ्ठल बडे या प्रकरणाचा तपास करीत आहेत. दोन दिवसापूर्वी विकी, भारत व मुकेश यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र त्यांना नोटीस देऊन सोडून देण्यात आले. इतर आरोपी मोकाट असून तपासात दिरंगाई होत असल्याचा आरोप जयस्वा यांनी केला. तर वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर अवताडे यांनी पोलीस तपासात ज्यांचा गुन्ह्यात जसा सहभाग आहे. त्याप्रमाणात कारवाई करण्यात येत असल्याचे अवताडे यांचे म्हणणे आहे.
Web Summary : Police filed a case against seven individuals, including two BJP officials, for vandalizing a garage in Ulhasnagar. Three were detained and released with notices. The complainant alleges investigation delays.
Web Summary : उल्हासनगर में एक गैराज में तोड़फोड़ के मामले में दो भाजपा अधिकारियों सहित सात लोगों के खिलाफ मामला दर्ज किया गया। तीन को हिरासत में लिया गया और नोटिस देकर रिहा कर दिया गया। शिकायतकर्ता ने जांच में देरी का आरोप लगाया।