शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

मुंबई नाशिक महामार्गावर अपघात; रस्त्यावर पसरला उलटलेल्या ट्रकमधील कोळसा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2021 10:56 IST

रस्त्यावर पसरलेला कोळसा जेसीबीच्या मदतीने तातडीने बाजूला केल्याने सकाळच्या सुमारास या मार्गावरील वाहतूक सुरळीत सूरु झाली होती. या अपघातात एका ट्रकचा चालक आणि दुसऱ्या ट्रकचा क्लिनर असे दोघे जखमी झाले आहेत.

ठाणे: छत्तीसगड येथून मुंबईला कोळसा घेऊन जाणाऱ्या ट्रकला पाठी मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात कोळश्याचा ट्रक जागीच उलटला आणि त्यातील कोळसा रस्ताभर पसरला. ही घटना बुधवारी पहाटे ठाण्यातील मुंबई-नाशिक महामार्गावर घडली. (Accident on Mumbai-Nashik Highway; Coal from an overturned truck spread on the road)

रस्त्यावर पसरलेला कोळसा जेसीबीच्या मदतीने तातडीने बाजूला केल्याने सकाळच्या सुमारास या मार्गावरील वाहतूक सुरळीत सूरु झाली होती. या अपघातात एका ट्रकचा चालक आणि दुसऱ्या ट्रकचा क्लिनर असे दोघे जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणाचा तपास राबोडी पोलीस करत आहेत.

ट्रकचालक सहजोद इक्बाल अहमद आणि क्लिनर मोसिम कासिम खान (२५) हे दोघे छत्तीसगड येथून  कोळश्याचा ट्रक घेऊन मुंबईला निघाले होते. ते ठाण्यातील मुंबई-नाशिक महामार्गावरील (मुंबई वाहिनीवर), साकेत पुलाशेजारी, रुस्तमजी टॉवरसमोरून जात होते. याच वेळी मागून येणाऱ्या गायीच्या खुराकाने भरलेल्या भरधाव ट्रकची कोळश्याच्या ट्रकला धडक बसली. हा ट्रक मालक आणि चालक प्रमोद पाटोदकर हे धुळे ते मुंबई, असा नेत होते.

ही धडक एवढी जोरात होती, की कोळश्याचा ट्रक रस्त्यावर जागीच उलटला आणि त्यातील कोळसा रस्ताभर पसरला. हा प्रकार बुधवारी पहाटे सव्वा एक वाजण्याच्या सुमारास घडला. अपघाताची माहिती मिळताच, ठामपा प्रादेशिक आपत्ती विभागाचे कर्मचारी, वाहतूक पोलीस अधिकारी, राबोडी पोलीस अधिकारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी १ जेसीबी, २ हायड्रा क्रेनला पाचारण करत तातडीने महामार्गावर पसरलेला कोळसा जेसीबीच्या साहाय्याने बाजूला करण्यात आला. तसेच दोन्ही ट्रक महामार्गाच्या एका बाजूला करून मुंबई-नाशिक महामार्ग सर्व वाहनांसाठी मोकळा करण्यात आला. 

या अपघातात ट्रक चालक प्रमोद पाटोदकर (34) यांच्या डोक्याला आणि मानेला किरकोळ दुखापत झाली आहे आणि उलटलेल्या ट्रकचा क्लिनर मोसिम कासिम खान यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्या दोघांनाही कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे ठामपा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :AccidentअपघातCrime Newsगुन्हेगारीthaneठाणेhighwayमहामार्गPoliceपोलिस