शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
4
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
5
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
6
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
7
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
8
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
9
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
10
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
11
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
12
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
13
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
14
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
15
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
16
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
17
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
18
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
19
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!

अभिनेत्रीला शिवीगाळ करणाऱ्या टेलिकॉल सेंटरचा पर्दाफाश; ठाणे खंडणीविरोधी पथकाची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2024 07:32 IST

ठाण्यातील घोडबंदर रोड भागात राहणाऱ्या सिनेकलाकार तरुणीला वेगवेगळ्या क्रमांकांवरून फोन येत होते.

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : मोबाइल अॅपद्वारे कर्ज घेतलेल्या ग्राहकांच्या नातेवाइकांना, इतरांना शिवीगाळ करणाऱ्या भाईंदरमधील टेलिकॉल सेंटरचा पर्दाफाश ठाणे खंडणीविरोधी पथकाने केला. या टोळक्याने कर्ज न घेताही एका अभिनेत्रीसह कुटुंबीयांनाही अश्लील शिवीगाळ केल्याचे उघड झाले. राहुलकुमार दुबे (३३, रा. विरार, पालघर) याच्यासह तिघांना अटक केल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. 

ठाण्यातील घोडबंदर रोड भागात राहणाऱ्या सिनेकलाकार तरुणीला वेगवेगळ्या क्रमांकांवरून फोन येत होते. फोनवरील व्यक्तीने अॅपवरून लोन घेतले आहे, ते भरा. अन्यथा, फोन येणे सुरूच राहील, अशी धमकी देत शिवीगाळ करीत होती. वारंवार येणाऱ्या फोनला कंटाळून तिने अखेर चितळसर पोलिस ठाण्यात तक्रार केली. या गुन्ह्याची गांभीर्याने दखल घेत पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी ठाणे खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मालोजी शिंदे यांच्याकडे या प्रकरणाचा तपास सोपवला. पोलिस निरीक्षक वनिता पाटील, सहायक पोलिस निरीक्षक सुनील तारमळे, भूषण कापडणीस, श्रीकृष्ण गोरे, उपनिरीक्षक विजयकुमार राठोड आणि सुभाष तावडे आदींच्या पथकाने वायरलेस कनेक्ट व्हीआय कंपनीचा सिमकार्ड विक्रेता राहुलकुमार दुबे (३३, विरार) याला ताब्यात घेतले.

लोन वसुलीसाठी धमक्या

या वेळी पोलिसांनी टेलिकॉल सेंटर चालक शुभम ओझा (२९, रा. मीरा रोड) आणि अमित पाठक (३३, मालाड, मुंबई) या फोनवरून बोलणाऱ्या टेलिकॉलरला ताब्यात घेतले. चौकशीमध्ये त्यांच्याकडे स्लाइस फायनान्स, कोटक बँक, आयडीएफसी फस्ट बँक यांच्या लोन रिकव्हरीचे काम अॅग्रीमेंट करून दिल्याची माहिती उघड झाली.

लोन वसुलीसाठी फोन करून  ग्राहकांना शिवीगाळ करून धमकी देत असल्याचे आढळले. इतकेच नव्हे, तर लोन घेणाऱ्या ग्राहकांच्या फोन लिस्टमधील मोबाइल क्रमांकावर फोन करून त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करीत असल्याचेही स्पष्ट झाले. या आरोपींकडून संगणकातील 3 चार एसएसडी हार्डडिस्क, एक जीएसएम गेटवे, एक २४ पोर्ट स्विच, एक राउटर आणि तीन मोबाइल असा ७७ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

...अशी दिली गुन्ह्याची कबुली

कंपनीने सिमकार्ड विक्रीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी त्याच्याकडे आलेल्या ग्राहकांच्या नावावर दोन ते तीन सिमकार्ड काढल्याचे व त्यापैकी एक सिमकार्ड ग्राहकाला देऊन सिमकार्ड लोन रिकव्हरी टेलिकॉल सेंटरला विकल्याचीही कबुली दिली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसcyber crimeसायबर क्राइम