उल्हासनगरात सव्वा चार लाखाची बॅग पळविणारा गजाआड
By सदानंद नाईक | Updated: July 8, 2025 19:04 IST2025-07-08T19:04:16+5:302025-07-08T19:04:40+5:30
उल्हासनगर कॅम्प नं-१ येथून रवी लालचंद वाटवानी हे मोटरसायकलवरून शनिवारी सायंकाळी जात होते.

उल्हासनगरात सव्वा चार लाखाची बॅग पळविणारा गजाआड
उल्हासनगर : कॅम्प नं-१, अजमेरा कॉन्स्ट्रॅकशन संच्यरी कंपनीच्या संरक्षण भिंती जवळ चाकूचा धाक दाखवून सव्वा चार लाखाची बॅग घेऊन पळणाऱ्या दोघा पैकी एकाला पोलिसांनी जेरबंद केले. तर त्याचा साथीदार लवकरच गजाआड होण्याचे संकेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हणे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली.
उल्हासनगर कॅम्प नं-१ येथून रवी लालचंद वाटवानी हे मोटरसायकलवरून शनिवारी सायंकाळी जात होते. त्यावेळी वाहतूक कोंडीच्या ठिकाणी ऐक अज्ञात व्यक्ती वाटवानी यांच्या मोटरसायकलवर मागे बसला. मोटरसायकलवर बसलेल्या इसामने पाठीला चाकू लावून घरी कोण कोण आहेत. हे माहिती असल्याची धमकी वाटवानी यांना दिली. तसेच मोटरसायकल अजमेरा कॉन्स्ट्रॅकशन संच्यूरी कंपनीच्या संरक्षण भिंती जवळ उभी करण्यास सांगून चाकूच्या धाक दाखवून त्यांच्याकडील सव्वा चार लाख रुपये असलेली बॅग घेवून ऍक्टिव्हा गाडीवर आलेल्या साथीदारा सोबत पोबारा केला. वाटवानी यांनी उल्हासनगर पोलिस ठाणे गाठून, झालेला प्रकार उल्हासनगर पोलिसांना कथन केल्यावर, पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला.
उल्हासनगर पोलिसांनी सव्वा चार लाख रोकड असलेली बॅग घेऊन पोबारा करणाऱ्या दोघांचा शोध घेण्यासाठी तब्बल १०० सीसीटिव्ही कॅमेरे तपासून तांत्रिक विश्लेषणानंतर सुरेश विष्णू परघणे याला अटक केल्यावर त्याने चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून रोख २१ हजार, गुन्ह्यात वापरलेला चाकू, त्यादिवशीं घेतलेली हुडी जप्त केली. आरोपी परघणे याच्या साथीदाराचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हणे यांनी देऊन अटक आरोपी पडघने याच्यावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती दिली. अधिक तपास पोलीस करीत आहेत.