३५४ चा गुन्हा दाखल करण्यामागे मनसे नेत्याचा हात?; जितेंद्र आव्हाडांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2022 20:18 IST2022-11-29T20:17:23+5:302022-11-29T20:18:34+5:30
या प्रकरणातील तक्रारदार परिक्षित धुर्वे ह्याला मनसेच्या ठाण्यातील एका वरिष्ठ नेत्याने महाराष्ट्रातील एका वरिष्ठ नेत्याशी बोलणं करुन दिलं असा आरोप आव्हाडांनी केला.

३५४ चा गुन्हा दाखल करण्यामागे मनसे नेत्याचा हात?; जितेंद्र आव्हाडांचा दावा
ठाणे - हर हर महादेव चित्रपटादरम्यान विवियाना मॉल येथे झालेल्या गदारोळ प्रकरणावरून जितेंद्र आव्हाड यांनी मनसे नेत्यावर गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणात मनसे नेत्याने एका वरिष्ठाशी बोलून माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी भाग पाडलं असं आव्हाडांनी म्हटलं आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, या प्रकरणातील तक्रारदार परिक्षित धुर्वे ह्याला मनसेच्या ठाण्यातील एका वरिष्ठ नेत्याने महाराष्ट्रातील एका वरिष्ठ नेत्याशी बोलणं करुन दिलं. त्या दोघांनी मिळून तक्रारदाराच्या पत्नीला माझ्यावर 354 चा गुन्हा दाखल करण्यास सांगितले. मी त्या ताईचा आभारी आहे की त्या ताईने स्वत:हून सांगितले, मी असला घाणेरडा गुन्हा दाखल करु शकत नाही आणि आपल्या मतावर ती ठाम राहिली. घोडबंदरचा एक नगरसेवक ह्या सगळ्या प्रकरणात मध्यस्थी होता. म्हणजे माझ्यावर 354 चा गुन्हा दाखल करायचा हे कधीपासून ठरलं होतं ते बघा असा आरोप त्यांनी केला.
मी त्या ताईचा आभारी आहे, कि त्या ताईने स्वत:हून सांगितले, कि मी असला घाणेरडा गुन्हा दाखल करु शकत नाही. आणि आपल्या मतावर ती ठाम राहिली. घोडबंदरचा एक नगरसेवक ह्या सगळ्या प्रकरणात मध्यस्थी होता. म्हणजे माझ्यावर 354 चा गुन्हा दाखल करायचा हे कधीपासून ठरलं होतं ते बघा.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 29, 2022
काय होतं प्रकरण?
९ नोव्हेंबरला विवियाना मॉलमध्ये ‘हर हर महादेव’ या चित्रपटाचा रात्री खेळ बंद पाडण्यासाठी जितेंद्र आव्हाड आणि कार्यकर्ते गेले होते. त्यावेळी एका प्रेक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी आव्हाड यांच्यासह सुमारे १०० कार्यकर्त्यांविरुद्ध ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. चित्रपट बंद पाडण्यासाठी आलेल्या या आक्रमक कार्यकर्त्यांपैकी काही जण चित्रपट पाहणाऱ्या लोकांच्या अंगावर धावून गेले. तेव्हा परीक्षित आणि त्यांची पत्नी हे अग्रभागी असल्याने जमावातील आठ ते दहा लोकांनी या दोघांना धक्काबुक्की करून ठोसा-बुक्कीने मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटलं होते.