हिंदी सक्तीचा निर्णय घेतल्यानंतर महाराष्ट्रात संतप्त लाट उसळली होती. त्यानंतर सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतला. पण यानिमित्ताने हिंदी विरुद्ध मराठी या संघर्षाने पुन्हा डोकं वर काढले आहे. हिंदी भाषिकांना मराठीत बोलण्याचा आग्रह केल्याच्या काही घटना घडल्या. आता एका परप्रांतीय भय्याने मराठी माणसाला हिंदीतून बोल किंवा भोजपुरीतून, अशी मुजोरी केली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
काही दिवसांपूर्वी मिरा भाईंदरमध्ये मराठीतून बोलण्यावरून वाद झाला होता. आता विरारमध्ये अशीच घटना घडली आहे. पण, या घटनेत परप्रांतीय भय्या मराठी माणसाला हिंदी किंवा भोजपुरीतून बोल असे म्हणत आहे.
या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. विरार स्थानक परिसरात हा प्रकार घडला. परप्रांतीय रिक्षाचालक दुचाकीवरून जाणाऱ्या मराठी माणसालाच दमदाटी करत असल्याचे व्हिडीओत दिसत आहे.
विरार स्थानक परिसरात मराठी व्यक्ती आणि रिक्षाचालक यांच्यात शुल्लक कारणावरून वाद झाला. त्यानंतर मला मराठी येत नाही. हिंदीत बोल किंवा भोजपुरीमध्ये. मीडियाला बोलावं. मी हिंदीतच बोलेन असे हा परप्रांतीय रिक्षाचालक म्हणत आहे.