डोंबिवलीत 22 वर्षाच्या तरुणीवर तीन रिक्षाचालकांचा सामूहिक बलात्कार,पीडितेसोबत नेमके काय घडले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 18:48 IST2026-04-02T18:46:52+5:302026-04-02T18:48:42+5:30
Dombivli Crime: डोंबिवलीत एका तरुणीवर तीन रिक्षाचालकांनी सामूहिक बलात्काराचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी टिळकनगर पोलिसांनी तिघांना अटक केली.

डोंबिवलीत 22 वर्षाच्या तरुणीवर तीन रिक्षाचालकांचा सामूहिक बलात्कार,पीडितेसोबत नेमके काय घडले?
Dombivli crime news: डोंबिवतील टिळकनगर परिसरात एका २२ वर्षीय तरुणीवर तीन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना गुरुवारी समोर आली. तरुणी आणि आरोपींपैकी दोन रिक्षाचालक एकमेकांना ओळख होते. त्यांनी याच ओळखीचा गैरफायदा घेत तिच्यावर अत्याचार केल्याचे पोलिसांनी सांगितले. टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली.
दोघांशी ओळख, पार्टीचे आमिष
चेतन चव्हाण, हेमंत चव्हाण आणि उमेश वर्मा अशी तिन्ही आरोपींची नावे आहेत. हे तिघेही रिक्षा चालवतात. यातील दोन जणांशी पीडित तरुणीची आधीपासून ओळख होती. त्याच ओळखीचा फायदा घेत दोघांनी आणखी एकाला यात सामील करून घेतले आणि तरुणीवर अत्याचार केले.
दोघांनी तरुणीला पार्टी करुया असे सांगितले. दोघांनाही आधीपासूनच ओळखत असल्याने तरुणीही पार्टीसाठी तयार झाली. दोघे तिला घेऊन पार्टीसाठी बाहेर निघाले, पण ते रेस्टॉरंटला गेलेच नाही. त्यांनी तरुणीला त्यांच्या तिसऱ्या साथीदाराच्या घरी नेले.
तिथे गेल्यानंतर चौघांनी मद्यपान केले. मद्यपान जास्त झाल्याने तरुणीची शुद्ध हरपली. त्यानंतर तिघांनीही तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केले.
पोलिसांनी तक्रार येताच हलवली सूत्रे
शुद्धीत आल्यानंतर तरुणीला आपल्यावर अत्याचार झाल्याचे कळले. त्यानंतर ती टिळकनगर पोलीस ठाण्यात गेली आणि तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी रीतसर तक्रार घेऊन गुन्हा दाखल केला आणि तपास सुरु केला. तपासाला वेग देत पोलिसांनी काही तासातच चेतन चव्हाण, हेमंत चव्हाण आणि उमेश वर्मा या तिघांना अटक केली.