शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
2
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
3
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
4
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
6
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
7
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
8
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
9
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
10
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
11
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
12
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
13
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
14
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
15
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
16
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
18
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
19
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
20
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी

ठाणे जिल्ह्यातील रुग्ण संख्या 4403; एक दिवसात आढळले ११० नवे रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 8:00 PM

ठामपात बुधवारी सापडले 110 नवे रुग्ण ; नवीमुंबईत सहा जण दगावले

ठाणे - जिल्ह्यात बुधवारी 234 नवीन रुग्णांची नोंद झाल्याने एकूण रुग्ण संख्याही चार हजार 403 वर पोहोचली आहे. तर या आजाराने तब्बल नऊ जण दगावले असून मृतांची संख्या 138 इतकी झाली आहे. तर बुधवारी  सर्वाधिक 110 रुग्ण हे ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात मिळून आले आहेत. दिवसभरातील एकूण 234 रुग्णांपैकी 110 रुग्ण हे एकट्या ठामपामधील आहेत. तर अवघा एक रुग्ण हा अंबरनाथ येथे नोंदवला गेला आहे. तसेच दगावलेल्या नऊ पैकी 6 जण नवीमुंबई आणि 3 जण केडीएमसीमधील असल्याची माहिती ठाणे जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली.         ठामपात 110 नवे रुग्ण मिळाल्याने तेथील रुग्ण संख्या ही एक हजार 463 इतकी झाली आहे. त्याखालोखाल नवीमुंबईत 43 रुग्ण सापडल्याने तेथील रुग्ण संख्या एक हजार 364 झाली आहे. तर नवीमुंबईत सहा जण दगावले असून येथील एकूण मृतांची संख्या 45 वर गेली आहे. कल्याण डोंबिवलीत नवे 26 रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्ण संख्या 594 इतकी झाली आहे. तसेच केडीएमसीत तिघांचा मृत्यू ही झाला असून मृतांची संख्या ही 15 वर गेली आहे. 23 नवीन रुग्ण भिवंडीत मिळून आल्याने तेथील एकूण रुग्ण संख्या 77 झाली आहे. मिराभाईंदरमध्ये 14 नवे रुग्ण नोंदवल्याने एकूण रुग्ण संख्या 381 वर गेली आहे. उल्हासनगर आणि ठाणे ग्रामीण येथे प्रत्येकी 6 नवे रुग्ण मिळून आले असून तेथील एकूण रुग्ण अनुक्रमे 144 आणि 210 झाली आहे. बदलापुरात 5 नवे रुग्ण सापडल्याने तेथील रुग्ण संख्या ही 124 झाली असून एक रुग्ण हा अंबरनाथ येथे मिळून आला आहे. त्यामुळे तेथील एकूण रुग्ण संख्या 47 इतकी झाली आहे. तर बुधवारी ठामपा,उल्हासनगर, भिवंडी, अंबरनाथ,बदलापूर, मिराभाईंदर आणि ठाणे ग्रामीण या कार्यक्षेत्रात कोणीही दगावले नसल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे.

टॅग्स :thaneठाणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका