शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

‘रेंटल’मधील ४३ कुटुंबांना मिळाला न्याय

By admin | Updated: May 16, 2017 00:08 IST

नाला रुंदीकरणात बाधित झालेल्या ४३ कुटुंबांचे रेंटलच्या २१ घरांमध्ये पुनर्वसन करण्यात आले होते. परंतु, आता ११ महिन्यांनंतर त्यांना अखेर

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : नाला रुंदीकरणात बाधित झालेल्या ४३ कुटुंबांचे रेंटलच्या २१ घरांमध्ये पुनर्वसन करण्यात आले होते. परंतु, आता ११ महिन्यांनंतर त्यांना अखेर न्याय मिळाला असून या ४३ कुटुंबांना चाव्यांचे वाटप महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले.ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मागील काही महिन्यांपासून रस्ता रुंदीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. ही मोहीम हाती घेताना रहिवाशांना पुनर्वसनाची हमी मिळत असल्याने तिला यश आल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, वागळे इस्टेट येथील सम्राटनगर भागातील नाला रुंदीकरणाचे काम पालिकेने हाती घेतले होते. त्यानुसार, येथील रहिवाशांना १० जूनच्या रात्री ११ वाजता घरे खाली करण्यास सांगून त्यांना मानपाडा येथील रेंटलच्या घरांमध्ये पुनर्वसनाची हमीदेखील दिली. त्यानुसार, घरे मिळणार या हेतूने या रहिवाशांनी तयारी दर्शवली. त्या वेळेस ४३ कुटुंबांना तेथून हलवण्यात आले. परंतु, रेंटलच्या घरांची संख्या कमी असल्याचे सांगून तुम्हाला तात्पुरते २१ घरांमध्ये अ‍ॅडजस्टमेंट करून राहावे लागेल, असे सांगण्यात आले. त्यालाही त्यांनी त्यास होकार दिला. परंतु, ११ महिने पालिकेच्या खेटा घालूनही तुमचे काम आज होईल, उद्या होईल, फाइल रेडी होत आहे, अशी उत्तरे त्यांना प्रशासनाकडून देण्यात आली. ११ महिन्यांनंतरही न्याय न मिळाल्याने या रहिवाशांनी मागील आठवड्यात महापौर मीनाक्षी शिंदे यांच्याकडे धाव घेऊन त्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. त्यानुसार, महापौरांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन या रहिवाशांना तत्काळ घरे द्यावीत, असे आदेश दिले होते.