शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक न्याय भवनचे ४ वर्षांत केवळ फाउंडेशनचेच बांधकाम

By admin | Updated: February 2, 2016 03:57 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनच्या सुमारे ८ कोटी रुपये खर्चाच्या कामास २०११पासून प्रारंभ झाला. मात्र, पाच वर्षांच्या कालावधीत या इमारतीच्या फाउंडेशनचे काम मागील

सुरेश लोखंडे,  ठाणेडॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनच्या सुमारे ८ कोटी रुपये खर्चाच्या कामास २०११पासून प्रारंभ झाला. मात्र, पाच वर्षांच्या कालावधीत या इमारतीच्या फाउंडेशनचे काम मागील एक महिन्यापासून सुरू झाले आहे. दुर्लक्षितपणामुळे विलंबास होत असतानाही ‘कामांना सुरुवात झाली हे महत्त्वाचे’ असे सांगून समाजकल्याण सहायक आयुक्त उज्ज्वला सपकाळे यांनी निष्काळजीपणवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला आहे. शासनाकडून जागा प्राप्त होऊनही पाच वर्षांत इमारतीच्या केवळ फाउंडेशनचे काम सुरू झाले आहेत. १० हजार स्क्वेअर फुटांची ही इमारत तळ मजला वगळता चार मजल्यांची बांधली जाणार आहे. त्यासाठी ८ कोटी रुपये खर्चाची तरतूदही आहे. प्लॅन मंजुरीसाठी सतत अडथळा आल्याचे कारण समाजकल्याण विभागाकडून नमूद करण्यात आले. राज्यात सुमारे ३३ ठिकाणी सामाजिक न्याय भवन उभारण्यात येत आहे. त्यापैकी ठाणे जिल्ह्याचे न्याय भवन कळवा येथील सुमारे अडीच एकर जागेत उभे करण्याच्या कामास २०११मध्ये सुरुवात झाली. सुमारे २४ महिन्यांच्या (दोन वर्षे) कालावधीत ही इमारत उभी राहणे आवश्यक होते. सार्वजनिक बांधकाम विभागाकडूनही विलंब झाल्याचे सांगण्यात आले. न्याय भवनच्या पूर्णत्वाच्या कामाने गती न घेतल्यास काही संघटना आंदोलन छेडण्याच्या प्रयत्नात आहेत.