4 killed in 2 separate accidents in Dombivali; The three of the same family | डोंबिवलीत 2 वेगवेगळ्या अपघातात 4 जण ठार; एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश
डोंबिवलीत 2 वेगवेगळ्या अपघातात 4 जण ठार; एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश

डोंबिवली : डंपरने दुचाकीला दिलेल्या धडकेमध्ये एकाच कुटुंबातील चिमुरडीसह 3 जणांचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी डोंबिवलीत घडली. डोंबिवली एमआयडीसीच्या खंबाळपाडा परिसरात हा अपघात झाला. या अपघाताचे नेमके कारण मात्र समजू शकलेले नाही.

गणेश हेंद्रया चौधरी, उर्मिला गणेश चौधरी, हंसिका गणेश चौधरी ( 4 वर्षे) अशी या अपघातात एकाच कुटुंबातील मृत्युमुखी पडलेल्यांची नाव आहेत. तर ओम गणेश चौधरी हा 2 वर्षांचा चिमुरडा या अपघातात सुदैवाने बचावला असून त्याला किरकोळ दुखापत झाल्याचे समजते आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पूढील तपास करीत आहेत.

डोंबिवलीच्या घारडा सर्कल येथे झालेल्या आणखी एका अपघातात कल्याणातील प्रभाकर ठोके यांचा मृत्यू झाला आहे. पेशाने शिक्षक असणारे ठोके सकाळी शाळेत जात असताना त्यांचेही अपघाती निधन झाल्याबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: 4 killed in 2 separate accidents in Dombivali; The three of the same family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.