शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
2
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
3
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
4
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
5
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
6
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
7
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
8
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
9
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
10
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
11
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
12
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
13
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
14
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
15
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
16
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
17
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
18
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
19
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
20
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
Daily Top 2Weekly Top 5

विषबाधेने २० पशुपक्ष्यांचा मृत्यू

By admin | Updated: January 10, 2016 00:23 IST

नवघर पोलिसांच्या हद्दीतील सरस्वतीनगर परिसरात वावरणाऱ्या १५ भटक्या कुत्र्यांसह ३ कावळे व २ मांजरांनी विषारी पदार्थाचे सेवन केल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना ९ जानेवारीला

- राजू काळे,  भार्इंदरनवघर पोलिसांच्या हद्दीतील सरस्वतीनगर परिसरात वावरणाऱ्या १५ भटक्या कुत्र्यांसह ३ कावळे व २ मांजरांनी विषारी पदार्थाचे सेवन केल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना ९ जानेवारीला प्राणिमित्रांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आली आहे. येथील मैदानाला लागूनच तिवरक्षेत्र असल्याने त्यात लांडग्यांचा वावर असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत असल्याने सुरुवातीला आढळलेल्या मृत कुत्र्यांमुळे स्थानिकांना लांडग्यांच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाल्याचा संशय आला होता. परिसरातील प्राणिमित्र सरिताम अशोक उभे, लता पुजारी, लव्हली बाली, विशाल दीक्षित यांनी घटनास्थळी धाव घेऊन शोध घेतला असता ठिकठिकाणी १५ पेक्षा अधिक कुत्री, २ मांजरे व ३ कावळे बेशुद्धावस्थेत पडल्याचे निदर्शनास आले. त्या वेळी अनेक कुत्र्यांच्या तोंडातून फेस येत असल्याचे पाहून त्यांना विषबाधाच झाल्याच्या अंदाजावरून प्राणिमित्रांनी स्थानिक नगरसेवक राजू वेतोस्कर यांना घटनेची माहिती दिली. वेतोस्कर यांनी त्वरित पालिकेचे उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे व डॉ. दीपक कुरुळेकर यांना संपर्क साधला. उपायुक्तांनी पालघर जिल्ह्याच्या पशुधन विकास विभागाच्या सहायक आयुक्तांना संपर्क साधल्यानंतर वसईतील पशुधन विकास अधिकारी प्रदीप म्हात्रे दुपारी १२.१५ वा.च्या सुमारास घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बेशुद्धावस्थेतील कुत्र्यांची तपासणी केली असता त्यातील १५ कुत्र्यांसह ३ कावळे व २ मांजरांचा मृत्यू झाल्याचे सांगून २ कुत्र्यांसह त्यांच्या २ पिलांना वाचविण्यात यश मिळविले. याप्रकरणी नवघर पोलिसांत नोंद केली असून वैद्यकीय अहवालानंतरच घटनेचे कारण स्पष्ट होणार असले तरी विषबाधेप्रकरणी तपास सुरू करणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांनी सांगितले.