शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

खडकपाडा ठाण्यासाठी १५० रुपये

By admin | Updated: January 18, 2016 01:54 IST

कल्याणची वाढती लोकसंख्या आणि गुन्हेगारीचा आलेख लक्षात घेता बारावे (गोदरेज हिल) येथे खडकपाडा पोलीस ठाण्याची स्थापना केली आहे.

आकाश गायकवाड,  डोंबिवलीकल्याणची वाढती लोकसंख्या आणि गुन्हेगारीचा आलेख लक्षात घेता बारावे (गोदरेज हिल) येथे खडकपाडा पोलीस ठाण्याची स्थापना केली आहे. मात्र, नव्याने निर्माण केलेल्या या ठाण्यात पोहोचण्यासाठी मोहने-आंबिवली परिसरातील नागरिकांना मोठी कसरतकरावी लागते. रिक्षाने थेट जाण्यासाठी तीनवेळा रिक्षा बदलावी लागते. त्यासाठी मोहने-आंबिवलीवासीयांना सुमारे ५० ते १५० रु पये मोजावे लागत आहेत. त्यामुळे मोहने पोलीस चौकीतच गुन्हा दाखल करण्याची सुविधा सुरू करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.कल्याण पश्चिमेतील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पूर्वी पश्चिमेत रेल्वे स्टेशनजवळच महात्मा फुले चौक पोलीस ठाणे होते. वाढती लोकसंख्या, परिणामस्वरूप वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी तेथील पोलीसबळ अपुरे ठरत होते. मात्र, या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यास उंबर्डे-सापर्डे, गौरीपाडा, टावरीपाडा, गांधारे, आधारवाडी, बिर्ला कॉलेज परिसर, योगीधाम तसेच दुसऱ्या दिशेला ३-४ किमी अंतरावर असलेली आंबिवली पंचक्रोशी, तसेच उल्हासनगर रस्त्यावर असलेल्या वालधुनी या भागातून कोणत्याही वाहनाने येणाऱ्या नागरिकांना जास्त खर्चीक नसून सोयीचे ठरत होते. रिक्षाने पोहोचण्यासही जास्तीतजास्त १५ ते २० रु पये खर्च येत असे. मात्र, नव्याने निर्माण झालेल्या बारावे (गोदरेज हिल) येथील खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्र ार करण्यासाठी मोहने-आंबिवलीवासीयांना मोठी कसरत करावी लागत आहे. खडकपाडा पोलीस ठाणे हे मोहने-आंबिवली परिसरवगळता कल्याण पश्चिमच्या अन्य भागांच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. मात्र, आंबिवली परिसरातील नागरिकांना तेथे पोहोचणे त्रासदायक वा खूप खर्चीक आहे. या पंचक्र ोशीत कल्याण-डोंबिवली महापालिकेतील वडवली, अटाळी, आंबिवली, मोहने, एनआरसी कॉलनी, गाळेगाव ही पूर्वीची गावे आता शहरी रूप धारण करीत असल्याने लोकसंख्याही वाढत आहे. त्यामुळे या भागात कोणताही गुन्हा, अपघात वा अन्य प्रकार घडल्यास तक्र ारदाराकडे स्वत:चे वाहन नसल्यास रिक्षाने पोलीस ठाणे गाठण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. ठाणे पोलीस आयुक्तांनी याप्रकरणी जातीने लक्ष देऊन तातडीने निर्णय घेणे गरजेचे असल्याची प्रतिक्रि या जागरूक नागरिक गोवर्धन शिंदे यांनी व्यक्त केली आहे.