शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

१४ आॅक्टोबरला एसटीचे आंदोलन

By admin | Updated: October 13, 2016 03:13 IST

विविध मागण्यांंसाठी एस.टी.कामगार संघटनेद्वारे १४ आॅक्टोबरला राज्यस्तरीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून पालघर येथील विभागी

पालघर/वसई : विविध मागण्यांंसाठी एस.टी.कामगार संघटनेद्वारे १४ आॅक्टोबरला राज्यस्तरीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून पालघर येथील विभागी कार्यालासमोर आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील कामगार धरणे आंदोलन करणार आहेत. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाकडून मनमानी कारभार केला जात आहे. आर्थीक प्रश्नांची अंमलबजावणी निधीअभावी वेळेवर केली जात नाही. संघटनेच्या हक्कांवर बाधा आणली जात आहे. पदाधिकाऱ्यांवर आकसपुर्वक कारवाई केली जात आहे.शिस्त व आवेदन पद्धतीचा भंग करून निरनिराळी परिपत्रके प्रसारीत केली जात आहेत. नफ्याची नियते बंद केल्यामुळे तोटा येत आहे. कामगारांच्या वेतनात अपेक्षित वाढ केली जात नाही. या सर्व बाबींमुळे कामगारांमध्ये नाराजी पसरली आहे. त्यामुळे कामगारांच्या मागण्यांची पुर्तता समबद्ध काळात होणे आवश्यक आहे. ही पुर्तता न झाल्यामुळे १४ आॅक्टोबरला महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेद्वारे हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी सांगितले. राज्य परिवहनाच्या कामगारांना सातवा वेतन लागू करावे, त्यांना शासनात विलीन करण्यात यावे.कनिष्ठ वेतनश्रेणी रद्द करावी, नवीन कामगार करार होईर्पंत २५ टक्के अंतरिम वाढ लागू करावी.महागाई भत्त्याची ७५ टे थकबाकी दिवाळीपुर्वी देण्यात यावी. तसेच दिवाळी भेट म्हणून पंधरा हजार रुपये देण्यात यावे. थेट प्रवासी नसल्याचे कारण देवून बंद केलेल्या जादा नफ्याच्या गाड्या पुन्हा सुरु करण्यात याव्यात अशा मागण्या यावेळी करण्यात येणार आहेत. अशी माहिती विभागी अध्यक्ष भरत पेंढारी यांनी दिली. (प्रतिनिधी)