शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
3
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
6
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
7
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
8
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
9
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
10
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
11
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
12
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
13
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
14
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
15
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
16
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
17
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
18
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
19
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

मेट्रोमुळे १०६० वृक्ष होणार बाधित, ९० टक्के झाडांचे पुनर्रोपण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 2:42 AM

४० झाडे तोडणार, काहींच्या फांद्या छाटणार : ९० टक्के झाडांचे पुनर्रोपण

ठाणे : शहरासाठी डोकेदुखी ठरलेल्या वाहतूककोंडीच्या समस्येला पर्याय म्हणून मेट्रोचा दिलासा मिळणार असला तरी, त्यासाठी शहराच्या मध्यातून जाणाऱ्या मेट्रोलाइनमुळे तब्बल एक हजार झाडे बाधित होणार आहेत. त्यातील ९० टक्के झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे. मुलुंड चेकनाका ते माजिवडा जंक्शन आणि कापूरबावडीनाका ते कासारवडवली असे दोन भागात हे काम सुरू झाले असून, मुलुंड चेकनाका ते माजिवडा जंक्शन या टप्प्यात ६०२ झाडे बाधित होत आहेत. कापूरबावडी ते कासारवडवली या टप्प्यात ४५८ झाडे बाधित होणार असून, यात अनेक दुर्र्मीळ प्रजातींच्या झाडांचाही समावेश आहे.

ठाण्यात मेट्रो-४ चे मुलुंड चेकनाका ते कासारवडवली अशा या मार्गाचे काम सध्या जोरात सुरू आहे. हायवेला लागूनच जाणाºया या मेट्रोमार्गामुळे अनेक वर्षे जतन केलेल्या आणि शहरातील एकमात्र हरितपट्टा असलेल्या या भागातील हजारो वृक्षांवर कुºहाड कोसळणार आहे. मुलुंड चेकनाका ते माजिवडा जंक्शन या टप्प्याचे काम मे. सीएचईसीटीपीएल लाइन-४ जॉइंट व्हेंचर या कंपनीकडून सुरू आहे. या टप्प्यात एकूण ६०२ झाडे बाधित होणार आहेत.यातील तांत्रिकदृष्ट्या अडचणीची ठरणारी १७ झाडे तोडण्यात येणार आहेत. अनेक झाडे वाचवण्याचा प्रयत्न ठामपाचा वृक्ष प्राधिकरण विभाग करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याप्रमाणे ठामपाकडून ४७८ झाडांचे पुनर्रोपण तर १३ झाडे तोडणार असल्याचे तसेच उर्वरित झाडांच्या फांद्या छाटण्यात येणार आहेत.पुनर्राेपित झाडांमध्ये प्रामुख्याने २८० सोनमोहर, ६३ गुलमोहर, ३३ अरेकापाम, १० विदेशी चिंच, बारतोंडी, कदंब, टॅबोबुआसारख्या दुर्मीळ प्रजातींचा समावेश आहे. या झाडांच्या बदल्यात २३९० नवीन झाडांची लागवड करण्यात येणार असून त्यासाठी एक कोटी १९ लाख ५० हजार रु पयांची अनामत रक्कम कंपनीकडून घेण्यात येणार आहे. कापूरबावडी ते मानपाडा ते डोंगरीपाडा ते कासारवडवली या दुसºया टप्प्याचे काम रिलायन्स अस्ताल्डी जॉइंट व्हेंचर कंपनीकडून सुरू आहे. या टप्प्यात एकूण ४५८ झाडे बाधित होत आहेत. त्यातील ४३५ झाडांचे पुनर्राेपण करणार असून १७ झाडे तोडावी लागणार आहेत. सहा झाडे मृत झाली आहेत.२२९0 झाडे नव्याने लावून करणार भरपाईच्पुनर्राेपित करणाºया झाडांमध्ये २१३ झाडे ही पेल्टोफोरम, ५२ गुलमोहर, २९ सप्तपर्णी, २६ बकुळ, १२ जंगली चेरी तसेच अकेशिया, टॅबोबुआसारख्या दुर्मीळ प्रजातींचा समावेश आहे.च्सदर झाडांचा ०.६ फूट ते १०.९ फुटांपर्यंत खोडांचा घेर आहे. या झाडांचे आयुर्मान ३ ते ३० वर्षांचे आहे. या वृक्षांच्या बदल्यात २२९० नव्या झाडांचे वृक्षारोपण होणार आहे.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाMetroमेट्रो