उल्हासनगरात १०४ ग्रॅम वजनाच्या सोन्याचा अपहार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 18:35 IST2025-12-06T18:34:12+5:302025-12-06T18:35:22+5:30
सोने व्यापारी सुनिल परशराम वलेचा यांनी सोन्याचे दागिने बनविण्यासाठी १०४ ग्रॅम वजनाचा सोन्याचा तुकडा दागिने बनविणाऱ्या कारागीराला दिला.

उल्हासनगरात १०४ ग्रॅम वजनाच्या सोन्याचा अपहार
उल्हासनगर : सोने व्यापारी सुनिल परशराम वलेचा यांनी सोन्याचे दागिने बनविण्यासाठी १०४ ग्रॅम वजनाचा सोन्याचा तुकडा दागिने बनविणाऱ्या कारागीराला दिला. मात्र कारागीराने सोन्याचे दागिने बनवून देण्या ऐवजी अपहार केल्याचा प्रकार उघड आला असून याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
उल्हासनगर कॅम्प नं-२, परिसरात सोनार गल्ली असून याठिकाणी सुनील वलेचा यांचा सोन्याचा व्यवसाय आहे. त्यांनी १९ ऑक्टोबर रोजी २४ कॅरेट १०४ ग्रॅम वजनाचा सोन्याचा तुकडा दागिने बनविण्यासाठी सोन्याचा कारागीर रोहीत रूप लष्कर याला दिला. २२ ऑक्टोबर २०२५ रोजी ऑर्डरप्रमाणे सोन्याचे दागिणे बनवुन देणार होता. परंतु त्याने वलेचा यांना सोन्याचे दागिणे बनवून न देता व सोने परत न करता फसवणुक करून सोन्याचा तुकडाचा अपहार केल्याचा प्रकार उघड झाला. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.