शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

ई-लर्निंगमध्ये १०० नवी अ‍ॅप

By admin | Updated: December 8, 2015 00:45 IST

ठाणे महापालिकेच्या शाळांमध्ये सुरू करण्यात येणाऱ्या ई-लर्निंग पद्धतीमध्ये १०० वेगवेगळ्या अ‍ॅप्लिकेशन्सचा वापर करण्यात येणार असून या पद्धतीमुळे पालिका

ठाणे : ठाणे महापालिकेच्या शाळांमध्ये सुरू करण्यात येणाऱ्या ई-लर्निंग पद्धतीमध्ये १०० वेगवेगळ्या अ‍ॅप्लिकेशन्सचा वापर करण्यात येणार असून या पद्धतीमुळे पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना माहितीचे दालन खुले होणार असल्याची माहिती महापालिकेच्या शिक्षण विभागाने दिली आहे. विद्यार्थ्यांची अभ्यासक्षमता, आकलनशक्ती, प्रश्न सोडविण्याचे कौशल्य यामध्ये विकास होण्याकरिता ही पद्धत अत्यंत उपयोगी ठरेल, असा दावाही त्यांनी केला आहे. स्थायी समिती सभापती नरेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेमध्ये या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. पालिकेच्या शाळांमधील शैक्षणिक दर्जा सुधारावा, यासाठी या शाळांमध्ये ई-लर्निंगचे वर्ग सुरू करण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून ठेवण्यात आला होता. व्होकार्ड फाउंडेशन ही ना नफा आधारित सामाजिक सेवा देणारी तसेच समाजकल्याण कार्यात राष्ट्रीयस्तरावर काम करणारी संघटना असून ती विद्यार्थ्यांना ई-लर्निंगमार्फत शिक्षण देत आहे. विद्यार्थ्यांचा उच्च व गुणात्मक शैक्षणिक दर्जा सुधारावा म्हणून नवनवीन शोधप्रक्रियेद्वारे शिक्षणाचे काम करत आहे. यामध्ये ई-लर्निंग पद्धत राबवताना विविध प्रकारच्या १०० अ‍ॅप्लिकेशन्सचा वापर केला जाणार असून विद्यार्थ्यांची अभ्यासक्षमता, आकलनशक्ती, प्रश्न सोडविण्याचे कौशल्य यामध्ये विकास होण्याकरिता तसेच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व शैक्षणिक दर्जा आदी वाढविण्यासाठी मदत होणार आहे. ही पद्धत महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या मराठी, उर्दू आणि इंग्रजी माध्यमाच्या नर्सरी ते दहावीपर्यंतच्या शाळांच्या अभ्यासक्र मावर आधारित असून यामध्ये विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रम दृकश्राव्य पद्धतीने शिकवून आनंददायी वातावरणात प्रश्न सोडविणे शक्य होणार आहे. ही पद्धत शास्त्रोक्त असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी प्रवृत्त करून विद्यार्थी परीक्षेची भीती न बाळगता सहजपणे खेळीमेळीच्या वातावरणात परीक्षा देऊ शकतील. यामध्ये एकूण २४ संच पुरविण्यात येणार असून त्यापैकी १२ संच व्होकार्ट फाउंडेशन मोफत देणार आहे.