शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
2
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
3
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
4
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
5
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
6
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
7
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
8
"मला नाही वाटत आपण एकत्र काम करू शकतो..", भन्साळींनी फरदीन खानला केलं होतं रिजेक्ट, हे होतं कारण
9
विक्री वाढली, Maruti Suzukiची तिजोरी भरली; आता कंपनी देणार इतिहासातील सर्वात मोठा डिविडंड
10
'महाराष्ट्रातला शेतकरी मेला पाहिजे, पण गुजरातचा...'; कांदा निर्यातीवरुन राऊतांची पंतप्रधानांवर टीका
11
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
12
TMKOC Sodhi Missing: तारक मेहता फेम 'सोढी' किडनॅप? पोलिसांनी दाखल केली केस; CCTV समोर
13
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
14
Motilal Oswal Financial Share Price : १ वर ३ बोनस शेअर्स देण्याची घोषणा, ३३४% वाढला कंपनीचा नफा; वर्षभरात स्टॉक ३१५% वाढला
15
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
16
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
17
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
18
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
19
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?

यूएस ओपन टेनिस : सेरेनाचा सहज विजय, मरे, दिमित्रोव्ह पराभूत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2020 5:03 AM

आपले २४ वे ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावण्यासाठी उत्सुक असलेल्या सेरेना विलियम्सने सरळ सेट््समध्ये विजय मिळवत यूएस ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला

न्यूयॉर्क : आपले २४ वे ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावण्यासाठी उत्सुक असलेल्या सेरेना विलियम्सने सरळ सेट््समध्ये विजय मिळवत यूएस ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला, पण अनुभवी अँडी मरे व ग्रिगोर दिमित्रोव्ह यांना पुरुष एकेरीत गाशा गुंडाळावा लागला.स्टीफन्सने दुसºया फेरीत ओल्गा गोर्वात्सोव्हाचा ६-२, ६-२ ने पराभव केला. सेरेनाची स्टीफन्सविरुद्धची कामगिरी ५-१ अशी आहे. या दोघींदरम्यान यापूर्वी शेवटची लढत २०१५ च्या फे्रंच ओपनमध्ये झाली होती. स्टीफन्सने २०१३ मध्ये आॅस्ट्रेलिया ओपनमध्ये सेरेनाविरुद्ध अखेरचा विजय मिळवला होता. पुरुष विभागात गेल्या वर्षीचा उपविजेता दानिल मेदवेदेवने ११६ वे मानांकन असलेल्या आॅस्ट्रेलियाच्या ख्रिस्टोफर ओकोनेलचा ६-३, ६-२, ६-४ ने पराभव केला. तिसरी फेरी गाठणाºया अन्य खेळाडूंमध्ये सहावे मानांकन प्राप्त मॅटियो बेरटिनी, आठवे मानांकन प्राप्त रॉबर्ट बातिस्ता आगुट, १० वे मानांकन प्राप्त आंद्रई रुबलेव्ह, ११ वे मानांकन प्राप्त कोरेन काचनोव्ह, २०१४ चा चॅम्पियन मारिन सिलीच आदींचा समावेश आहे. पण अँडी मरे, १४ व्या मानांकित ग्रिगोर दिमित्रोव्ह व २५ व्या मानांकित मिलोस राओनिच यांना पराभव स्वीकारावा लागला. दिमित्रोव्हला हंगेरीच्या मार्टन फुस्कोविक्सने ६-७(५), ७-६(४), ३-६, ६-४, ६-१ ने पराभूत केले.(वृत्तसंस्था)‘बर्थ डे बॉय’ थीमकडून नागल पराभूतन्यूयॉर्क : सुमित नागलने सामन्यात संघर्षपूर्ण खेळ केला खरा, पण अखेर त्याला २७ वा वाढदिवस साजरा करीत असलेल्या थीमकडून पराभव स्वीकारावा लागला. या निकालामुळे नागलचे यूएस ओपनमधील पुरुष एकेरीतील आव्हान संपुष्टात आले. तिसºया स्थानावर असलेल्या थीमने सरळ तीन सेट््समध्ये नागलचा ६-३, ६-३, ६-२ ने पराभव करीत तिसरी फेरी गाठली.नागलने टिष्ट्वट केले,‘आभार, २०२० यूएस ओपन. बरेच काही शिकायला मिळाले. मेहनत घेणे सुरूच ठेवणार. समर्थनासाठी सर्वांचे आभार.’ नागलने पहिल्या फेरीत विजय मिळवला होता. ग्रँडस्लॅम स्पर्धेत गेल्या सात वर्षांत पहिल्या फेरीत विजय मिळविणारा पहिला भारतीय ठरला होता.२३ ग्रँडस्लॅम विजेतेपदापैकी ६ ग्रँडस्लॅम जेतेपद येथे जिंकणाºया सेरेनाने गुरुवारी रात्री आर्थर अ‍ॅश स्टेडियममध्ये जागतिक क्रमवारीत ११७ व्या स्थानावर असलेल्या रशियाच्या मारग्रिटा गैस्पारयानचा ६-२, ६-४ ने पराभव केला.सेरेनाला यानंतरच्या फेरीत २०१७ मध्ये यूएस ओपनची चॅम्पियन व येथे २६ वे मानांकन असलेल्या सेलोनी स्टीफन्सच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.महिला विभागात नवव्या मानांकित योहाना कोंटाला सोरेना क्रिस्टियाने २-६, ७-६(५), ६-४ ने, गर्बाइन मुगुरुजाला स्वेताना पिरोनकोव्हाने ७-५, ६-३ ने पराभूत केले. बेलारुसच्या व्हिक्टोरिया अजारेंकाने मायदेशातील सहकारी व पाचवे मानांकन प्राप्त आर्यना सबालेंकाचा ६-१, ६-३ ने पराभव केला.

टॅग्स :Tennisटेनिसserena williamsसेरेना विल्यम्स