Tennis player Borna Coric and Grigor Dimitrov tests positive for COVID-19  | टेनिसच्या कोर्टवरही कोरोना; दोन स्टार खेळाडू पॉझिटिव्ह, नोव्हाक जोकोव्हिचची होणार टेस्ट

टेनिसच्या कोर्टवरही कोरोना; दोन स्टार खेळाडू पॉझिटिव्ह, नोव्हाक जोकोव्हिचची होणार टेस्ट

जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या 90 लाख 67,559 इतकी झाली आहे. त्यापैकी 48 लाख 50,475 रुग्ण बरे झाले असून 4 लाख 71, 027 लोकांना प्राण गमवावे लागले. क्रीडा विश्वातही कोरोनानं शिरकाव केला आहे. क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी, मश्रफे मर्तझा यांच्यानंतर टेनिसच्या कोर्टवरही कोरोनानं शिरकाव केला आहे. क्रोएशियाचा बोर्ना कॉरीक आणि बल्गेरियाचा ग्रिगोर दिमित्रोव्ह यांना कोरोना झाल्याचे समोर आले आहे. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान असलेल्या नोव्हाक जोकोव्हिचनं आयोजित केलेल्या प्रदर्शनीय सामन्यात दोघंही सहभागी झाले होते.

गौतम गंभीरकडून MS Dhoniचं कौतुक; विराट कोहलीच्या पाठीशी ठाम उभा राहिला नसता तर...

जोकोव्हिचनं मागील आठवड्यात  Adria Tour exhibition सामना आयोजित केला होता. त्यानंतर दिमित्रोव्ह आणि कॉरिक हे अनुक्रमे रविवारी व सोमवारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले. कॉरिक हा जागतिक क्रमवारीत 33 व्या क्रमांकावर आहे. त्यानं सांगितलं की,''माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकानं चाचणी करून घ्यावी असं आवाहन मी करतो. माझ्यामुळे तुम्हाला होणाऱ्या मनस्तापासाठी माफी मागतो. मी आता तंदुरुस्त आहे आणि अजून कोरोनाची लक्षण दिसत नाही.'' 

या स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येकाची चाचणी होणार आहे. त्यात जोकोव्हिचचाही समावेश आहे. 


WWE सुपरस्टार 'अंडरटेकर' निवृत्त; त्याचं खरं नाव तुम्हाला माहित्येय? 

७५० विकेट्स घेणाऱ्या भारतीय गोलंदाजाचं निधन; सचिन तेंडुलकरनं वाहिली श्रद्धांजली 

Fact Check : पाकिस्तानी गोलंदाज मोहम्मद इरफानचा मृत्यू? पीसीबीच्या ट्विटनंतर चर्चेला उधाण 

विराट कोहलीच्या नवीन घड्याळाची किंमत एवढी की निघेल पाकिस्तानी क्रिकेपटूचा दीड महिन्याचा पगार

The Undertaker Retirement : अंडरटेकर अन् केन यांच्यात खरंच होतं का रक्ताचं नातं?   

The Undertaker Retirement : या आलिशान घरात राहणाऱ्या अंडरटेकरची संपत्ती कितीय माहित्येय? 

Web Title: Tennis player Borna Coric and Grigor Dimitrov tests positive for COVID-19 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.