गौतम गंभीरकडून MS Dhoniचं कौतुक; विराट कोहलीच्या पाठीशी ठाम उभा राहिला नसता तर...

2014च्या इंग्लंड दौऱ्यातील कसोटी मालिकेनंतर अनेकांची कारकिर्द धोक्यात आणली..

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 03:32 PM2020-06-22T15:32:50+5:302020-06-22T15:34:25+5:30

whatsapp join usJoin us
Credit should go to MS Dhoni for backing Virat Kohli after a disastrous England tour in 2014: Gautam Gambhir | गौतम गंभीरकडून MS Dhoniचं कौतुक; विराट कोहलीच्या पाठीशी ठाम उभा राहिला नसता तर...

गौतम गंभीरकडून MS Dhoniचं कौतुक; विराट कोहलीच्या पाठीशी ठाम उभा राहिला नसता तर...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्दे2014च्या इंग्लंड दौऱ्यावर विराट कोहली अपयशी ठरला होता10 डावांमध्ये त्याला केवळ 134 धावा करता आल्या होत्या

भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर नेहमीच माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर टीका करत आला आहे. पण, सोमवारी गंभीरनं चक्क धोनीचं कौतुक केलं. विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधील कारकिर्द वाचवण्यात धोनीचा महत्त्वाचा वाटा आहे आणि त्याचं श्रेय द्यायलाच हवं, असं मत गंभीरनं व्यक्त केलं. वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेतील अपयश आल्यानंतर त्याला डावळण्यात आले होते. त्याचे कसोटी संघात पुनरागमन केलं, परंतु खेळण्याची संधी मिळाली नाही. पण, धोनीनं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार सामन्यांच्या मालिकेत विराटला संधी दिली. त्या मालिकेत शतक करणारा तो एकमेव भारतीय फलंदाज होता.

The Undertaker Retirement : अंडरटेकर अन् केन यांच्यात खरंच होतं का रक्ताचं नातं?   

The Undertaker Retirement : या आलिशान घरात राहणाऱ्या अंडरटेकरची संपत्ती कितीय माहित्येय? 

2014मध्ये कोहली इंग्लंड दौऱ्यावर पहिली कसोटी मालिका खेळायला गेला, परंतु त्याला अपयश आलं. इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर तो चाचपडत होता. त्याला 10 डावांमध्ये केवळ 134 धावा करता आल्या आणि जेम्स अँडरसननं त्याल चार वेळा बाद केले. 2014च्या दौऱ्यातील अपयश मागे टाकून कोहलीनं पुढील इंग्लंड दौऱ्यात तुफान फटकेबाजी केली. याबाबत भारतीय संघाचा माजी फलंदाज व्हिव्हीएस लक्ष्मणनं सांगितले की,''2014च्या दौऱ्यातील अपयशानंतर विराट कोहली 2018मध्ये इंग्लंड दौऱ्यावर गेला आणि तेथे त्यानं बर्मिंगहॅम येथे पहिल्याच डावात खणखणीत शतक ठोकलं. त्यानं चार वर्षांपूर्वी आलेलं अपयश पूर्णपणे झटकून दमदार कामगिरी केली. जागतिक स्तरावरील खरा सुपरस्टार काय असतो, हे त्यानं दाखवून दिलं होतं.''

गौतम गंभीरनं याचं श्रेय धोनीला दिलं. तो म्हणाला,''लक्ष्मणच्या मताशी मी सहमत आहे. 2014च्या त्या दौऱ्यानंतर अनेकांची कारकिर्द संपुष्टात आली. विशेषतः कसोटी कारकिर्द. पण, धोनी कोहलीच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला आणि त्याला संधी दिली. त्यामुळेच तो कसोटीतही आता दबदबा निर्माण करू शकला.'' 

2014च्या इंग्लंड दौऱ्यानंतर कोहलीनं ऑस्ट्रेलियात दमदार कमबॅक केले. त्यानं 8 डावांमध्ये 692 धावा केल्या. त्यानं पहिल्या कसोटीत संघाचे नेतृत्वही सांभाळले होते. कोहलीनं कसोटी क्रिकेटमध्ये 86 सामन्यांत 7240 धावा केल्या आहेत. भारताकडून कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये तो सहाव्या स्थानावर आहे. त्यानं 7 द्विशतकं झळकावली आहेत आणि अशी कामगिरी कोणत्याही भारतीय फलंदाजाला जमलेली नाही.

WWE सुपरस्टार 'अंडरटेकर' निवृत्त; त्याचं खरं नाव तुम्हाला माहित्येय? 

७५० विकेट्स घेणाऱ्या भारतीय गोलंदाजाचं निधन; सचिन तेंडुलकरनं वाहिली श्रद्धांजली 

Fact Check : पाकिस्तानी गोलंदाज मोहम्मद इरफानचा मृत्यू? पीसीबीच्या ट्विटनंतर चर्चेला उधाण 

विराट कोहलीच्या नवीन घड्याळाची किंमत एवढी की निघेल पाकिस्तानी क्रिकेपटूचा दीड महिन्याचा पगार

Web Title: Credit should go to MS Dhoni for backing Virat Kohli after a disastrous England tour in 2014: Gautam Gambhir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.