मियामी : प्रसिद्धीच्या शिखरावर विराजमान असलेल्या खेळाडूंच्या आलीशान राहणीमानाचा कधीकधी सामान्यांना हेवा वाटतो. त्यांची लाईफस्टाईल कोणालाही भुरळ घालेल अशीच असते. त्यामुळेच त्यांच्या भवती चाहत्यांचा नेहमीच घोळका असतो. आपल्या आवडत्या खेळाडूसोबत सेल्फी काढण्यासाठी त्यांचा आटापीटा चालू असतो आणि तो सेल्फी मिळाला की काय करू-काय नाय करू अशी चाहत्यांची अवस्था होते. पण, एका चाहत्यानं स्टार खेळाडूसोबतच्या सेल्फीचा असा काही वापर केला, की अनेकांचे डोकं चक्रावली. त्याच्या या प्रतापाचा मनस्ताप स्टार खेळाडूला सहन करावा लागला तो वेगळा.


कॅनडाची सुपरस्टार टेनिसपटू युजीन बुचार्डबाबत घडलेला हा किस्सा... आपल्या खेळासोबतच बुचार्डनं तिच्या सुंदरतेनंही अनेकांवर मोहिनी केली आहे. त्यामुळे तिच्यासोबत घडलेला हा प्रसंग त्वरितच सोशल व्हायरल झाला. झालं असं की... बुचार्डने एका चाहत्याचा सेल्फीचा आग्रह पूर्ण केला, तशीही टेनिसपटू चाहत्यांसोबत सेल्फी काढतात आणि त्यात त्यांना काही धोकाही वाटत नाही. पण, या प्रसंगामुळे कोणाला सेल्फी द्यावा का, याचा विचार नक्की टेनिसपटू करतील.

घडलं असं की...
बुचार्डसोबत एका चाहत्यानं सेल्फी काढला... त्यानंतर तोच सेल्फी त्यानं मियामितील एका हॉटेल व्यवस्थापनाला दाखवून आपण बुचार्डचा भाऊ असल्याचा दावा त्यानं केला. जवळपास दोन महिने हा चाहता बुचार्डचा भाऊ बनून त्या हॉटेलमध्ये राहिला. तेथील पंचतारांकित सोई-सुविधांचा लाभ त्यानं घेतला... त्यानंतर झालेले 63 हजार अमेरिकन डॉलरचे बिल बुचार्डच्या नावानं पाठवून दिलं....

सोलोमन श्लोमो अझारी असे या चाहत्याचे नाव आहे. बुचार्डला हा प्रकार कळताच तिनं पोलिसांत तक्रार केली आणि मियामी पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्याजवळ पोलिसांना कोकेनही सापडले. अझारी हा दोन महिने या हॉटेलमध्ये राहिला होता.  

Web Title: Grand Scam: Man posing as Eugenie Bouchard’s brother lived at her expense for 2 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.