फेडररने सातव्यांदा गाठली आॅस्ट्रेलियन ओपनची अंतिम फेरी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2018 10:08 PM2018-01-26T22:08:51+5:302018-01-26T22:09:11+5:30

गतविजेत्या रॉजर फेडररने शुक्रवारी पुन्हा आॅस्ट्रेलियन ओपन टेनिसची पुरुष गटात अंतिम फेरी गाठली. द. कोरियाचा चुंग हियोन जखमी होताच त्याने उपांत्य सामना सोडून दिला.

Federer's seventh round of Australian Open final | फेडररने सातव्यांदा गाठली आॅस्ट्रेलियन ओपनची अंतिम फेरी

फेडररने सातव्यांदा गाठली आॅस्ट्रेलियन ओपनची अंतिम फेरी

Next

मेलबोर्न: गतविजेत्या रॉजर फेडररने शुक्रवारी पुन्हा आॅस्ट्रेलियन ओपन टेनिसची पुरुष गटात अंतिम फेरी गाठली. द. कोरियाचा चुंग हियोन जखमी होताच त्याने उपांत्य सामना सोडून दिला. फेडररची अंतिम फेरीत गाठ पडेल ती मारिन सिलिचविरुद्ध. पहिल्यांदा ग्रॅण्डस्लॅमची उपांत्य फेरी गाठणाºया हियोनच्या पायाला त्रास सुरू झाला होता. त्याने माघार घेतली त्यावेळी फेडरर ६-१, ५-२ असा पुढे होता. हियोनने पहिल्या दोन गेममध्ये ‘टाइम आऊट’ घेत पायावर उपचार करून घेतले. तरीही त्रास वाढल्यानंतर त्याने सामना सोडून देण्याचा निर्णय घेतला. एक तास दोन मिनिटे चाललेल्या खेळादरम्यान दुसºया सेटमध्ये २१ वर्षांचा हियोन २-५ असा माघारला होता. त्याचवेळी सामना थांबविण्याची त्याने विनंती केली. हियोनच्या दुखापतीबद्दल फेडरर म्हणाला,‘दुखापतीचे काही सांगता येत नाही, मैदानावर कधी जखम उमळेल हे अखेरपर्यंत कळत नाही. हियोनला असाच त्रास झाला. मात्र तो दिग्गज खेळाडू असल्याने पुन्हा चांगली कामगिरी करण्यास सज्ज होईल.’

फेडररने सातव्यांदा आॅस्ट्रेलियन ओपनची अंतिम फेरी गाठली. या स्पर्धेतील सहाव्या आणि करियरमधील २० व्या ग्रॅण्डस्लॅमवर त्याचा डोळा आहे. सिलिचविरुद्ध फेडररचेच पारडे जड आहे. अमेरिकन ओपन चॅम्पियन सिलिचविरुद्ध फेडररने नऊपैकी आठ लढती जिंकल्या असून, एकदा पराभव पत्करला आहे. यंदा आॅस्ट्रेलियन ओपनमध्ये त्याने एकही सेट गमावलेला नाही.

बाबोस-म्लादेनोविच
जोडी दुहेरीत विजेती
मेलबोर्न: टिमिया बाबोस आणि ख्रिस्टिना म्लादेनोविच या पाचव्या मानांकित जोडीने आॅस्ट्रेलियन ओपन टेनिसचे महिला दुहेरीचे जेतेपद पटकविले. या जोडीने निर्णायक लढतीत एकतेरिना मकारोवा आणि एलिना व्हेस्रिना या रशियाच्या दुसºया मानांकित जोडीचा फडशा पाडला. हंगेरीची बाबोस आणि फ्रान्सची म्लादेनोविच यांनी अंतिम सामना ६-४, ६-३ असा जिंकला. या जोडीचे हे पहिलेच ग्रॅण्डस्लॅम आहे. याआधी या जोडीने २०१४ च्या विम्बल्डन फायनलमध्ये धडक दिली होती. त्यानंतर २०१५ मध्ये दुबई, मराकाश आणि रोम येथे दुहेरीचे जेतेपद पटकविले. जेतेपदानंतर बाबोस म्हणाली,‘हा अनोखा क्षण आहे. माझ्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. म्लादेनोविचसोबत खेळणे शानदार ठरले.’

बोपन्नाची वाटचाल दुसºया ग्रॅण्डस्लॅमकडे
मेलबोर्न: रोहन बोपन्ना याने हंगेरीची जोडीदार टिमिया बाबोस हिच्या सोबतीने आॅस्ट्रेलियन ओपन टेनिसची मिश्र दुहेरीची अंतिम फेरी गाठली. यामुळे तो दुसºया ग्रॅण्डस्लॅम जेतेपदानजीक पोहोचला आहे. बोपन्नाने उत्कृष्ट सर्व्हिस केली तर बाबोसने परतीचे उत्तम फटके मारले. या जोडीने उपांत्य सामन्यात ब्राझीलचा मार्सेलो डेमोलियर आणि स्पेनची मारिया मार्टिनेझ जोडीवर ७-५, ५-७, १०-६ ने विजय साजरा केला. मागच्या वर्षी बोपन्नाने कॅनडाची गॅब्रिएला दाब्रोव्हस्की हिच्या सोबतीने फ्रेंच ओपन जिंकून पहिले ग्रॅण्डस्लॅम पटकविले होते. महेश भूपती, लियांडर पेस आणि सानिया मिर्झा यांच्यानंतर महत्त्वाची स्पर्धा जिंकणारा बोपन्ना चौथा भारतीय टेनिसपटू आहे.

Web Title: Federer's seventh round of Australian Open final

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.