शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

काय सांगता? इंटरनेटवर फक्त 140 रूपयात विकलं जातं तुमचं प्रोफाइल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2019 4:45 PM

तुम्हाला माहीत आहे का? वर्ल्ड वाइल्ड वेबच्या या जाळ्यामध्ये तुमची प्रोफाइल विक्रीसाठी उपलब्ध आहे. फक्त तुमचीच नाही तर आपल्या सर्वांच्याच फ्रोफाइल्सची विक्री करण्यात येते.

तुम्हाला माहीत आहे का? वर्ल्ड वाइल्ड वेबच्या या जाळ्यामध्ये तुमची प्रोफाइल विक्रीसाठी उपलब्ध आहे. फक्त तुमचीच नाही तर आपल्या सर्वांच्याच फ्रोफाइल्सची विक्री करण्यात येते. यातील सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे, हा डेटा फक्त हॅकर्स नाही तर अनेक बड्या कंपन्यांसह मार्केट रिसर्चरही खरेदी करत आहेत. तुम्हाला थोडासा तरी अंदाज बांधू शकता का की, तुमच्या डेटाची किंमत काय असेल? नाही ना... तुमचा डेटा या कंपन्यांना प्रतिदिन फक्त 140 रूपयांमध्ये विकण्यात येत आहे. 

'डार्क वेब' नावाच्या या जगामध्ये रेग्युलर ब्राउजर्समार्फत प्रवेश करता येत नाही. अनोळखी कम्युनिकेशनसाठी परवानगी देणाऱ्या टॉरसारख्या ओपन सोर्स सॉफ्टवेअर्सचा वापर करावा लागतो. अशा सॉफ्टवेअर्समार्फत डार्क वेब एक्सेस करण्यात येतं. इंटरनेटच्या या लपलेल्या भागामध्ये, हॅकर्स इंटरनेट यूजर्सची माहिती मिळवत असून यामध्ये पासवर्ड, टेलिफोन नंबर्स आणि ई-मेल आयडी यांसारख्या माहितीचा समावेश करण्यात आला आहे. 

3 ग्रुप करत आहेत डेटा सेल 

एक्सपर्टच्या म्हणण्यानुसार, हा डेटा मिळवण्याऱ्यांमध्ये सायबर अटॅक करणाऱ्या, कंज्यूमर्स बिहेवियर ट्रॅक करणारे आणि व्हिडीओ स्ट्रीमिंग साइट्स फ्रीमध्ये यूज करण्यासाठी एक्सेस मिळवणाऱ्यांचा समावेश असतो. काळजी करण्याची गोष्ट म्हणजे, असा डेटा त्या कंपन्यांकडून खरेदी करण्यात येत आहे. ज्यांना आपल्या प्रतिस्पर्ध्यांच्या कंज्यूमर बेसची माहिती मिळवायची आहे. या कंपन्या आपल्या विरोधी कंपन्यांच्या मुख्य एग्जिक्युटिव्सनाही ट्रॅक करू इच्छितात. 

हॅकर्सचा एक ग्रुप इनक्रिप्टेड पासवर्ड्ससोबत डेटा लिक करतो तर, दुसरा ग्रुप त्यांना डीक्रिप्ट करतो. नवभरत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, आता एक तिसरा ग्रुप आहे, जो या डीक्रिप्टेड पासवर्ड्सची लिस्ट तयार करत असून यांना एका सेंन्ट्रल सर्व्हरवर स्टोअर करत आहे. येथून डेटा ब्रीच होतो आणि हॅकर्ससाठी हा एक कॉमन सोर्स म्हणून काम करतो. 

सिंगल पासवर्डचा वापर करणं सर्वात मोठी कमजोरी

जर तुम्ही आपल्या अनेक अकाउंट्ससाठी एक सिंगल पासवर्ड किंवा थोडा वेगळा पासवर्ड वापरत असाल तर, तुम्ही पासवर्ड लगेच बदलणं गरजेचं आहे. असा अंदाज वर्तव्यात येत आहे की, हॅकर्सनी फक्त लहान वेबसाइटमधूनच 7,000-8,000 डेटाबेस एकत्र केला आहे. यामध्ये मोठ्या साइट्सवरून चोरी करण्यात आलेल्या डाटाचा समावेश करण्यात आलेला नाही. यूजर डेटा वेगवेगळ्या पॅकेजमध्ये विकण्यात येतो. त्यांना एक दिवसासाठी 2 डॉलर (साधारणतः 140 रुपये) आणि 3 महिन्यांसाठी 70 डॉलर (साधारणतः 4,900रुपये)चं पॅकेज देण्यात येतं. ग्राहक क्रिप्टोकरेंसी म्हणजेच, बिटकॉइन, लाइटकॉइन, डॅश, रिपल, ईदरियम आणि जेडकॅशमार्फत हा डेटा खरेदी करू शकतात. 

एक्सपर्ट्सच्या मते, जर एखाद्या हॅकरला एका यूजर मल्टीपल पासवर्ड मिळाला. तर तो त्या प्रोफाइलला काही मनिटांमध्येच विक्रिसाठी उपलब्ध करू शकतो. अनेक यूजर्स नेहमी मल्टीपल अकाउंट्ससाठी एकच पासवर्ड ठेवतात. यावरून त्यांच्या वागण्याचा अंदाज लावला जातो. यूजर डेटा ट्रॅक करणं इंटरनेटवर एखाद्या व्यक्तीच्या अॅक्टिव्हीटी लेव्हलवर अवलंबून असतं. 

टॅग्स :technologyतंत्रज्ञानInternetइंटरनेटMediaमाध्यमेcyber crimeसायबर क्राइमInternationalआंतरराष्ट्रीय