xiaomi mi 10 launch today here s expected price specifications | जबरदस्त फीचर्स असलेला Xiaomi Mi 10 स्मार्टफोन आज होणार लाँच; जाणून घ्या खासियत
जबरदस्त फीचर्स असलेला Xiaomi Mi 10 स्मार्टफोन आज होणार लाँच; जाणून घ्या खासियत

ठळक मुद्देXiaomi Mi 10 मध्ये  90Hz कर्व्ड डिस्प्ले आणि क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. Mi 10 मध्ये 108 मेगापिक्सल पेंट कॅमरा सेटअप आणि 16 जीबी रॅम आहे.LPDDR 5 रॅम असलेला हा जगातील पहिला स्मार्टफोन असल्याचा दावा कंपनीने केला.

नवी दिल्ली - चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमीच्या नव्या फोनबाबत ग्राहकांमध्ये नेहमीच कमालीची उत्सुकता असते. शाओमी आज फ्लॅगशिप स्मार्टफोन Mi 10 लाँच करणार आहे. लाँचिंग आधी शाओमीने याचा एक प्रमोशनल व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये Xiaomi Mi 10 च्या दमदार फीचर्सची माहिती मिळते. या नव्या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसर देण्यात आला असून तो अत्यंत पॉवरफूल प्रोसेसर आहे.  शाओमी Mi 10 रूबिक्‍स क्‍यूबच्या वर्ल्ड चँपियनला हरवले आहे. प्रमोशन व्हिडीओमध्ये कशा पद्धतीने हरवले हे दाखवण्यात आले आहे. कंपनीचे सीईओ ली जून यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. 

शाओमीने भारतीय बाजारात चांगलाच जम बसविला आहे. Xiaomi चे फोन भारतात सर्वाधिक विकले गेले आहेत. Xiaomi Mi 10 मध्ये  90Hz कर्व्ड डिस्प्ले आणि क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. Mi 10 हा स्मार्टफोन गेल्या वर्षी लाँच झालेल्या Mi 9 चं अपग्रेड आहे. रिपोर्टनुसार, Mi 10 मध्ये 108 मेगापिक्सल पेंट कॅमरा सेटअप आणि 16 जीबी रॅम आहे. तसेच  LPDDR 5 रॅम असलेला हा जगातील पहिला स्मार्टफोन असल्याचा दावा कंपनीने केला आहे.  LPDDR 5 च्या मदतीने डेटा अ‍ॅक्सेसचा स्पीड हा 50 टक्क्यांपर्यंत वाढवता येतो.  

Xiaomi Mi 10 ची किंमत नेमकी किती असणार याची माहिती देण्यात आलेली नाही.  8 जीबी + 128 जीबी व्हेरिएंट CNY 4,200 जवळपास 43,000 रुपये) किंमतीत लाँच होऊ शकतो. तसेच Mi 10 च्या 8 जीबी + 256 जीबीसाठी CNY 4,500 (जवळपास 46,000 रुपये) आणि 12 जीबी + 256 जीबी मॉडलसाठी CNY 4,900 (जवळपास 50,200 रुपये) असू शकतात. या नव्या फोनमध्ये 4,500 एमएएचच्या बॅटरीसोबत 50 वॉटचं फास्ट चार्जिंग फीचर मिळू शकतं . तसेच कनेक्टिव्हिटीसाठी कंपनी डिव्हाईसमध्ये 5जी, वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस, एनएफसी आणि यूएसबी टाइप-सी पोर्टसारखे फीचर्स देण्याची शक्यता आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

शाओमीने Mi Super Sale चे आयोजन केलं आहे. हा सेल 8 फेब्रुवारीपासून सुरू झाला आहे. शाओमीने आपल्या युजर्ससाठी दमदार ऑफर्स आणल्या आहेत. 16 फेब्रुवारीपर्यंत हा सेल सुरू असणार आहे. या सेलमध्ये शाओमीच्या Redmi 8A सह अनेक स्मार्टफोनवर दमदार ऑफर्स देण्यात आल्या आहेत. शाओमी रेडमी 8 ए या फोनवर Mi Super Sale मध्ये तब्बल 2000 रुपयांपर्यंत सूट मिळणार आहे. 7,999 रुपयांऐवजी 6,499 रुपयांमध्ये हा फोन विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. तसेच कार्डचा वापर केल्यास ग्राहकांनी आणखी सूट मिळणार आहे. खरेदीसाठी ICICI क्रेडिट कार्डचा वापर केला तर 5% की इंस्टंट डिस्काउंट मिळणार आहे. या फोनमध्ये 2 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज देण्यात आले आहे. 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेजसाठी 6,999 रुपये (एमआरपी 8, 999) मोजावे लागणार आहेत. 

xiaomi redmi desh ka dumdaar smartphone will launch today on amazon will come with 5000mah battery | Xiaomi चा

Redmi Note 7 Pro, Redmi K20, Redmi Note 8 Pro, Redmi Note 8, Redmi K20 Pro, Redmi Go, Redmi Y3, Redmi Note 7S, Redmi 7 या फोन्सवर दमदार ऑफर्स देण्यात आल्या आहेत. तसेच 2000 ते 6000 पर्यंत सूट देण्यात आली आहे. गॅजेट्सवर भन्नाट ऑफर्स देण्यात आल्या आहेत. रेडमी वाय 3 वर 4000 पर्यंत सूट देण्यात आली आहे. 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 7, 999 रुपयांना (एमआरपी - 11, 999) मिळत आहे. तसेच रेडमी 8 ए सारखंच फोनच्या खरेदीसाठी ICICI क्रेडिट कार्डचा वापर केला तर 5% की इंस्टंट डिस्काउंट मिळणार आहे. 

'या' बातम्या ही नक्की वाचा

आता Google वरून करा फोनचा रिचार्ज ; कसं ते जाणून घ्या

अवघ्या 10 सेकंदात अनलॉक करा स्मार्टफोन, फॉलो करा सोप्या स्टेप्स...

इंटरनेट असुरक्षिततेमुळे जागतिक स्तरावर वाढले हॅकिंग

Mi Super Sale 2020 : Redmi 8A सह 'या' स्मार्टफोन्सवर दमदार ऑफर्स

WhatsApp ला हॅकिंगचा धोका; त्वरित अ‍ॅक्टिव्हेट करा 'हे' सिक्यॉरिटी फीचर्स 

महत्त्वाच्या बातम्या

नेत्यांवरील गुन्हे जनतेला कळू देत, ते वेबसाईटवर प्रकाशित करा; सुप्रीम कोर्टाचा आदेश

China Coronavirus : जागतिक आरोग्य संघटनेनं 'कोरोना'ला दिलं नवं नाव

दिल्लीहून बिहारला जाणाऱ्या बस अन् ट्रकचा भीषण अपघात, 16 जणांचा मृत्यू, 35 जखमी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा 'तो' व्हिडीओ पाहून मन हेलावून गेलं- संभाजी राजे

 

Web Title: xiaomi mi 10 launch today here s expected price specifications

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.