शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शाओमीचे सीईओ कोणता फोन वापरतात माहित्येय?; नेटकऱ्यांनी एका पोस्टमधून काढलं शोधून

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2020 16:51 IST

शाओमीने भारतीय बाजारात ही चांगलाच जम बसविला असून भारतात शाओमीचे फोन्स हे सर्वाधिक विकले जातात.

चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी Xiaomi आपल्या दमदार स्मार्टफोन्ससाठी प्रसिद्ध आहे. जगभरातील युजर्ससाठी सातत्याने कंपनी विविध प्रोडक्ट लाँच करत असते. शाओमीने भारतीय बाजारात ही चांगलाच जम बसविला असून भारतात शाओमीचे फोन्स हे सर्वाधिक विकले जातात. शाओमीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) लेई जून (Lei Jun) हे कोणत्या फोनचा वापर करतात हे आता नेटिझन्सनीच एका पोस्टमधून शोधून काढलं आहे. जून हे आयफोनचा वापर करत असून त्याचा वापर करताना पकडले गेले आहेत. एका रिपोर्टमधून ही माहिती समोर आली आहे. लेई जून यांनी सोशल मीडियावर आयफोनवरून एक पोस्ट केली होती. मात्र त्याची ही पोस्ट नेटिझन्सच्या नजरेस पडली आणि ते आयफोन वापरत असल्याचं बरोबर हेरलं. 

शाओमीच्या सीईओनाही Apple ची भुरळ पडली आहे. स्वतःच्या कंपनीचा फोन न वापरता Apple वर अवलंबून असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. तसेच चूक लक्षात येताच जून यांनी ती पोस्ट त्वरीत डिलीट केली मात्र तो पर्यंत ती जोरदार व्हायरल झाली होती. त्याचा स्क्रीनशॉट व्हायरल झाला असून शाओमीच्या फोनपेक्षा आयफोन कसा चांगला आणि बेस्ट आहे याचीच चर्चा सर्वत्र रंगली. याआधीही अनेकदा अँड्रॉईड स्मार्टफोन कंपनीचे अनेक अधिकारी आयफोन वापरत असताना पकडले गेले आहेत. काहींनी कंपनीचा फोन न वापरण्यावरून जून यांच्यावर टीका केली आहे. तर काहींनी त्यांची बाजू घेतल्याचं दिसून येत आहे. 

शाओमी उद्योग गुंतवणूक विभागाचे भागीदार असलेल्या पॅन जियूटांग यांनी जून यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. 'स्मार्टफोन कंपन्यांचे कार्यकारी अधिकारी हे प्रतिस्पर्धी ब्रँडच्या माहितीसाठी, भविष्यातील कल्पकतेसाठी Apple आणि सॅमसंग यासारख्या इतर कंपन्यांचा वापर करतात' असं पॅन यांनी म्हटलं आहे. अनेक कंपन्याचे सीईओ आयफोन वापर करत असताना पकडले गेले आहेत. काही दिवसांपूर्वी Realme India चे मुख्य कार्यकारी अधिकारी माधव शेठ यांनाही अशाच गोष्टीचा सामना करावा लागला होता. त्यांनी आपल्या कंपनीच्या फोन्सची माहिती देणारं ट्विट हे आयफोवरून केलं होतं. एका इंग्रजी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : 'झिंक आणि गरम पाण्याने कोरोनाग्रस्त बरे झाले', डॉक्टरचा दावा

देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी उल्लेख केलेलं 'Y2K' नेमकं आहे तरी काय?

CoronaVirus News : बापरे! ज्याच्या घरात चोरी केली तोच निघाला कोरोना पॉझिटिव्ह; मग...

CoronaVirus News : रिक्षातून केला तब्बल 1500 किमीचा प्रवास पण घरजवळ येताच...; मन सुन्न करणारी गोष्ट

CoronaVirus News : "हजारो मुलं-मुली रस्त्यावर... आज भारत माता रडतेय"

CoronaVirus News : मंत्री शिंकले, सगळेच घाबरले अन् पुढे झालं असं काही...

CoronaVirus News : ... म्हणून 50 हजार गर्भवतींची होणार कोरोना टेस्ट; 'या' राज्याने घेतला निर्णय 

CoronaVirus News : कोरोनाच्या लढ्यात 'ही' सवय फायदेशीर ठरेल; 50 टक्के संसर्गाचा धोका टळेल

 

टॅग्स :xiaomiशाओमीApple Incअॅपलtechnologyतंत्रज्ञानMobileमोबाइल